भडणेत आषाढी एकादशीनिमित्त तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते महाआरती; विठ्ठल चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी साकडे
1 min read

भडणेत आषाढी एकादशीनिमित्त तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते महाआरती; विठ्ठल चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी साकडे

Loading

भडणेत आषाढी एकादशीनिमित्त तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते महाआरती; विठ्ठल चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी साकडे

भडणे (ता. शिंदखेडा)
: आषाढी एकादशीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिंदखेडाचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा, अभिषेक व महाआरती संपन्न झाली. पुरोहित राजेंद्र महाराज यांच्या मंत्रोच्चारात झालेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्यासमवेत अजय बोरसे व त्यांच्या सहपत्नींना महाआरतीचा मान देण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी सकाळी गावातून ग्रामस्थ, महिलावर्ग व भजनी मंडळाच्या सहभागाने पारंपरिक ध्वज मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात विठ्ठल मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भजन, हरिनाम संकीर्तन व धार्मिक कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध झाले.

भाविकांच्या सेवेसाठी डॉ. युवराज देसले यांच्या हस्ते मोफत केळी वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र पाटील, माजी सरपंच भबुतराव पाटील, अशोक पाटील, निंबा पाटील, कथेसिंग गिरासे, पुरुषोत्तम गिरासे, जगतसिंग गिरासे, मनोज पाटील, चुडामन पाटील, विशाल माळी, शिवाजी माळी, धनराज पाटील, विठोबा पाटील, अशोक माळी, मंडळ अधिकारी मनोज गोसावी, योगेश बागुल तसेच भडणेचे पोलीस पाटील युवराज माळी यांच्यासह ग्रामस्थ, महिलावर्ग आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते तहसीलदार नितीन कुमार देवरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि वारकरी परंपरेचा संगम घडविणारा हा सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला.

चौकट :

विठुरायाच्या चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना

> “यावर्षी विठुरायाच्या कृपेने संपूर्ण तालुक्यावर भरपूर व समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शिवारात समृद्धी नांदावी, प्रत्येक शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळावे आणि सर्वांच्या जीवनात सुख-शांती लाभावी, अशी प्रार्थना मी श्री विठ्ठलाच्या चरणी केली.”

— नितीन कुमार देवरे
तहसीलदार, शिंदखेडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *