उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; चेतन सोनवणे यांना ‘उद्योजकरत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
1 min read

उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; चेतन सोनवणे यांना ‘उद्योजकरत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

Loading

उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; चेतन सोनवणे यांना ‘उद्योजकरत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त धुळ्यात झाला भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा

अमळनेर प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव २०२६ निमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत

हेअर व्हि जार्ड शॉप चे संचालक चेतन भगवान सोनवणे यांना प्रतिष्ठेचा ‘उद्योजकरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावर सामाजिक न्याय, मानवाधिकार संरक्षण, भ्रष्टाचारविरोध, पर्यावरण संवर्धन तसेच समाजातील विविध घटकांच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
धुळे येथील नगाव बारी, आकाशवाणी केंद्र, कांकरिया भवन, देवपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये आदर्श सरपंच, आदर्श पोलीस पाटील, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श ग्रंथपाल, आदर्श लॅब असिस्टंट तसेच उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात आला.

चेतन भगवान सोनवणे यांनी उद्योग क्षेत्रातून केलेले उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा, राष्ट्रनिष्ठा आणि समाजहितासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची ‘उद्योजकरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रफुल्ल सीताराम पाटील, प्रदेश महिला अध्यक्षा प्रा. मंदाकिनी भामरे, सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले तसेच शिवव्याख्याते सचिन देवरे यांच्या शुभहस्ते डॉ. चेतन सोनवणे यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर  चेतन सोनवणे यांनी हा सन्मान आपल्या कार्याची जबाबदारी अधिक वाढविणारा असल्याची भावना व्यक्त करत, भविष्यातही उद्योग क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या गौरवामुळे  चेतन भगवान सोनवणे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *