निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार ,  ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव
1 min read

निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार , ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार

‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर प्रतिनिधी :
तसेच देवगाव-देवळी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांच्या निर्भीड व सकारात्मक पत्रकारितेची दखल घेत त्यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने सन्मानित करण्यात आले. व्हाईस ऑफ मीडिया (VOM), आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातून हा मान मिळवणारे ईश्वर आर. महाजन हे एकमेव पत्रकार ठरले असून राज्यभरातील केवळ पंधरा पत्रकारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर तालुका व शहरातील विविध संघटना व मान्यवरांकडून त्यांचा जंगी सत्कार करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अमळनेर तालुक्याच्या वतीनेही महाजन सरांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, उपनगराध्यक्ष व शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, दयाराम पाटील, विंचुरकर सर, आर. यू. पाटील, जाकीर शेख, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता पवार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईश्वर आर महाजन यांच्या या यशामुळे अमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, त्यांच्या कार्याला सर्व स्तरांतून कौतुकाची थाप मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *