जीवनासाठी झुंज — दिपक माळीला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज!     31.50 लाखांच्या उपचारासाठी समाजाकडे भावनिक मदतीचे आवाहन 
1 min read

जीवनासाठी झुंज — दिपक माळीला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज!   31.50 लाखांच्या उपचारासाठी समाजाकडे भावनिक मदतीचे आवाहन 

Loading

 जीवनासाठी झुंज — दिपक माळीला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज! 

 31.50 लाखांच्या उपचारासाठी समाजाकडे भावनिक मदतीचे आवाहन 

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी अनिल माळी यांचा मुलगा दिपक माळी सध्या गंभीर आजाराशी जीवन-मरणाच्या झुंजीत आहे. त्याच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असून, तातडीने यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्याच्यावर नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी सुमारे ₹31,50,000 इतका प्रचंड खर्च अपेक्षित आहे. सर्वसामान्य परिस्थितीत असलेल्या माळी कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे अशक्यप्राय ठरत असून, कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.

“माझ्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी समाजाने मदतीचा हात पुढे करावा,” अशी हाक वडील अनिल माळी यांनी भावनिक स्वरात दिली आहे. दिपकच्या उपचारासाठी प्रत्येकाचे छोटेसे योगदानही अमूल्य ठरू शकते.

समाजातील दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी आणि सर्व नागरिकांनी या कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

📢 देणगी देण्यासाठी लिंक:
🔗 https://www.impactguru.com/fundraiser/help-dipak-mali

📲 ही मदतीची हाक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया आपल्या मित्रपरिवारात व सोशल मीडियावर शेअर करा.

🙏 आपल्या सहकार्याने एक अमूल्य जीव वाचू शकतो!
💫 “एकत्र येऊया… आणि दिपकला नवजीवन देऊया!” 💫

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *