रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट   ,अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
1 min read

रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट ,अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

Loading

रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट

अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

अमळनेर प्रतिनिधी : अवकाळी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरट्यांचे सावटही गडद होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अमळनेर येथील मुंदडा नगर, पाण्याच्या टाकीजवळ राहणारे शेतकरी छोटू महाजन यांची गाय मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सुमारे तीस हजार रुपये किमतीची ही गाय चोरीला गेल्याने छोटू महाजन यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीसोबत जनावरांवर उपजीविका अवलंबून असलेल्या या कुटुंबासाठी हा मोठा धक्का ठरला आहे.
अगोदरच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी अक्षरशः दुहेरी संकटात सापडला आहे. शहरात भुरट्या चोरट्यांचे प्रमाण वाढत असल्याचीही नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर युवा सामाजिक कार्यकर्ते कवीश पाटील व मुंदडा नगर परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. छोटू महाजन यांची गाय शोधून काढून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *