स्वबळावर लढाईची घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसची अमळनेरमध्ये रणनिती ठरविणारी बैठक , जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना; गटागटांत मेळाव्यांवर भर, पक्षाचा ठाम पाठिंबा
1 min read

स्वबळावर लढाईची घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसची अमळनेरमध्ये रणनिती ठरविणारी बैठक , जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना; गटागटांत मेळाव्यांवर भर, पक्षाचा ठाम पाठिंबा

Loading

स्वबळावर लढाईची घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसची अमळनेरमध्ये रणनिती ठरविणारी बैठक

जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना; गटागटांत मेळाव्यांवर भर, पक्षाचा ठाम पाठिंबा

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण व दिशादर्शक बैठक उत्साहात पार पडली. शिव पेट्रोलियमजवळील पक्ष कार्यालयात आयोजित या बैठकीस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना पक्षाचे जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला. “स्वबळावर निवडणुका लढवायच्या असून इच्छुकांनी आतापासूनच कामाला लागावे,” असे सांगत त्यांनी प्रत्येक गटात नियोजनबद्ध मेळावे घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच, “पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. बैठकीत निवडणूक रणनीती, बूथस्तरावरील नियोजन आणि पक्षविस्तार याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, इंजि. दिनकर पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, मनोहर नाना निकम, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता पवार, युवक तालुकाध्यक्ष योगेश शिसोदे, शहर कार्याध्यक्ष जाकिर शेख, किसान सेल अध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह माधवराव पाटील (धार), रवींद्र पाटील (लोण), संजय पवार, हरीश लाड (पातोंडा), विंचुरकर सर (रणाईचे), जिजाबराव पाटील (सडावण), अरुण देशमुख (खौशी), गोकुळ पाटील (बोहरा), सतीश काटे (कोळपिंपरी), ॲड. अलीम मुजावर (धार), भटू पाटील (पिंपळे), जयेश पाटील (वाघोदा) यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पक्षाच्यावतीने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे पत्रकार श्री. ईश्वर महाजन यांना राज्यस्तरीय पॉझिटिव्ह जर्नलिजम पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत निकम यांनी केले.
या बैठकीतून आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *