नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला!
1 min read

नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला!

Loading

नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला!

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील खडके येथील प्रगतिशील शेतकरी श्री. भावलाल चुडामण पाटील यांच्या नातवंडांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे.

कु. प्रांजल योजना वसंत पाटील यांनी कृषी उपसंचालक (क्लास-1) या उच्च पदावर यश मिळवले असून, कु. मानसी योजना वसंत पाटील यांनी कृषी मंडळ अधिकारी (क्लास-2) पदावर यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही मोठ्या पदांवर झेप घेता येते, याचा प्रेरणादायी संदेश समाजाला मिळाला आहे.

या यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष श्री. संजय पुनाजी पाटील, श्री. रणजीत भीमसिंग पाटील तसेच झाडी येथील श्री. दिपककुमार वसंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खडके गावातील या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *