राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो : ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी , रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवास्यांतर्फे साहित्य अकादमी पुरस्कृत लेखक / चित्रकार राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार
![]()
राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो : ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी
रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवास्यांतर्फे साहित्य अकादमी पुरस्कृत लेखक / चित्रकार राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार
मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क
जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे)
” राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो ” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी यांनी केले. सन २०२५ / २६ वर्षाचा राष्ट्रीय ‘ साहित्य अकादमी पुरस्कार ‘ साठी निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांच्या ” काळ्या निळ्या रेषा ” या मराठी आत्मकथनाची निवड घोषित झाल्या प्रित्यर्थ्य रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवाश्यांनी संयुक्तपणे बाविस्कर सरांचा हृद्य सत्कार दि. २७ मार्च रोजी आयोजित केला होता त्याप्रसंगी डॉ. तिवारी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.या अनौपचारिक भावस्पर्शी सत्काराप्रसंगी स्नेहपीठावर सत्कारमूर्ती राजू बाविस्कर त्यांच्या दिव्य कलाप्रवासाच्या साक्षीदार धर्मपत्नी भारती बाविस्कर , ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी उपस्थित होते.
पत्रकार डॉ. तिवारी आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, ” जातियवाद व आर्थिक परिस्थितीचे चटके सोसूनही रडगाणे न गाता बाविस्कर सरांनी आयुष्यात चांगुलपणाचाच नेहमी स्विकार केला.चांगुलपणा टिपण आणि चांगुलपणाची रेघ मोठी करत राहणं या त्यांच्या स्वभावाचा परतावा म्हणजे समस्त कॉलनी कौटुंबिक सत्कार समारंभ करताहेत हा अमीट अन् अविस्मरणीय इतिहास आहे. शेजाऱ्यांनी आत्मकथन वाचलं नसेल पण सर्वांनी समग्र राजू बाविस्कर सरांना वाचलयं म्हणून ही दुर्मिळ एकजूट पाहून मी भारावून गेलो ” तिवारींनी बाविस्कर सरांच्या विद्यार्थी दशेतील खडतर जीवन ते आजच्या सर्वोच्च यशोशिखर सर केल्यापर्यंतचा प्रेरक प्रवास संक्षेपाने सांगितला. आर्थिक अडचणीत मा.अशोकभाऊ जैन यांनी भवरलाल अँन्ड कांताबाई फाऊंडेशन शिष्यवृत्ती देऊन कलासाधनेला भक्कम आर्थिक आधार दिला.राज्यभर कलाप्रदर्शनी आयोजनाबाबत अमोल मार्गदर्शन केल्याने हा प्रवास सुकर होऊन आयुष्याचे सोने झाले असे मार्मिकपणे सांगितले.
*कार्यक्रमाची क्षणचित्रे*
🌷 सत्कारासाठी स्नेहपीठावर जातांना अनपेक्षित फुलांच्या वर्षावाने बाविस्कर कुटूंब झाले सद्गदीत
🦚 लेखक राजू बाविस्कर यांचा सत्कार शाल,श्रीफळ व कपडे देऊन पत्रकार दिलीप तिवारी यांच्या शुभहस्ते आणि सौ. भारती बाविस्कर यांचा सत्कार शाल , श्रीफळ व साडी देऊन सौ.शोभा भेंडवाल आणि नंतर वर्षा मराठे , वर्षा मोरे व अल्का अवचार यांनी केले.
🔰
थोरामोठ्यांसोबत इयत्ता पहिलीतील आराध्या भावसार या चिमुरडीने उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या भावना !
👑 सत्कारा निमित्ताने रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या तब्बल २०० कुटूंबांनी भंडाऱ्याप्रमाणे सामुहिक स्नेहभोजनाने साजरा केला आनंदोत्सव …
👑 सत्कारार्थी राजू बाविस्करांना मोठे प्रेझेंट देण्यापेक्षा तन, मन,धनाने प्रेझेंटी देऊन शेजारच्यांनी दिला अविस्मरणीय नजराणा
**********************
श्रीमती लता बाविस्कर , सौ.भारती बाविस्कर , सौ. शोभा भेंडवाल, दिव्या पाटील, कु. आराध्या भावसार यांनी मनोगत व्यक्त केले. कवी अरुणकुमार जोशींनी गौरवपर कविता सादर केली.
———————————-
सत्काराला उत्तर देतांना राजू बाविस्कर सर म्हणाले की, ” मी साधा माणुस असून पुरस्कार प्राप्त होण्यापूर्वीच अनपेक्षितपणे कॉलनिवासीयांनी केलेल्या सत्काराने मला मोठा आनंद दिला. सत्काराचं मी मोल करूच शकत नाही ! कॉलनीतल्या घरांना छतासाठी अलग भिंती आहेत मात्र सर्व मनाने एकजीव असल्याचा सुखद प्रत्यय आल्याची अपूर्वाई मी या जन्मात विसरणार नाही.
———————————-
प्रस्तावना गौरव समारंभाचे मुख्य संयोजक वसंत मराठे प्रस्तावनेत म्हणाले की, ” समाजाकडे बघण्याचा बाविस्कर सरांचा दृष्टिकोन आणि परिस्थितीशी सामना करण्याची हिम्मत हा आत्मचरित्राचा केंद्रबिंदू आहे. बाविस्कर सरांना पुरस्कार घोषित झाल्याने कलेक्टर साहेबांपासून शहरातील नामवंताचे पाय आमच्या कॉलनीला लागून कॉलनीला प्रसिद्धीच वलय प्राप्त झालं ! देशात नावलौकिक प्राप्त कलावंताचा सहज सहवास मिळतो याचे कॉलनीवसियांना सदैव भूषण आहे.” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव समिती सदस्य हरीष आटोळे, वसंत मराठे, कार्तिक मोरे , अरुण भेंडवाल, राहुल पाटील, हितेश पाटील, कैलास राणे, ज्ञानेश्वर पाटील, सुरेखा बेहेरे , कविता पाटील, रमेश महाजन यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वसंत मराठे व आभार प्रदर्शन कार्तिक मोरे यांनी केले.अनौपचारिक सत्काराला कॉलनीतील प्रत्येक कुटूंबातील लहान थोर यांसह सुनिल कोतकर व टोनी कोतकर उपस्थित होते.

