प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात*
1 min read

प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात*

Loading

*प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात*

जळगांव प्रतिनिधी
प्रभाकर तांडेकर ऊर्फ ‘प्रदत्त’ यांची ‘शिस्तभंग’ ही कविता संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. कॉम.-१, शब्दतरंग भाग -२ च्या मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
कवी प्रभाकर तांडेकर हे श्री ॠख्खडाश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कुही येथून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते ४० वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. कवी, लेखक, समीक्षक, हायकूकार म्हणून मराठी साहित्यात सुपरिचित आहेत. ते अनेक साहित्य संस्थांचा पदभार सांभाळत असून अनेक साहित्यसंमेलनाच्या यशस्वीतेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अनेक नामांकित वृत्तपत्रे, मासिके व इतर नियकालिकांत त्यांचे विविधांगी विषयावरचे लेखन प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी देश-विदेशातील इंग्रजी व मराठीच्या वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील जवळपास ६० च्या वर पुस्तकांना ब्लर्ब दिल्याने त्यांची ‘ब्लर्बमास्टर’ म्हणूनही ओळख आहे.
प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ऊर्मी’ हा २०१६मध्ये नागपूर विद्यापीठात एम. फिल्. च्या शोधप्रबंधासाठी पात्र ठरलेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत दर महिन्याला एक लाख प्रतीत प्रकाशित होणा-या ‘आमची अंगणवाडी’ या मासिकात त्यांची एकमेव काव्यमालिका सातत्यपूर्ण प्रकाशित झालेली आहे. कवी ‘प्रदत्त’ यांचे ‘ऊर्मी’, ‘प्रभाकरा…’ हे कवितासंग्रह; ‘कृती काई’ हायकूसंग्रह, ‘मानवतेची आस : संत रविदास’ चरित्रपुस्तक प्रकाशित असून ‘ऊर्मी’वरील ‘ऊर्मी : आस्वादन व समीक्षण’ हा समीक्षाग्रंथ प्राचार्य डॉ. सत्यवान मेश्राम यांनी संपादित केला आहे.
कवी ‘प्रदत्त’ यांनी अनेकदा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे परीक्षण केले आहे. अनेक कवीसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. नवोदित व प्रथितयश कवी/लेखकांच्या साहित्यकृतीनिर्मितीत त्यांचे मोठे योगदान दिले आहे. नवोदितांचे ते पाठीराखे आहेत; मार्गदर्शक आहेत; अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना व ब्लर्ब लिहून त्यांनी लिखाणासाठी प्रवृत्त केले आहे. अनेक साहित्यकृतींच्या सखोल परीक्षणातून त्यातील जमेची व उणिवांची जाणीव साहित्यिकांना करून त्यांच्या लेखणीला सजग केले आहे.
नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘शिस्तभंग’ या कवितेचा समावेश झाल्याने अनेक प्रतिभावंत साहित्यिकांनी, मान्यवरांनी तसेच सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांनी कवी ‘प्रदत्त’ यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यात मा. लोकनाथ यशवंत, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. कृष्णा साकुळकर, प्रा. बी. एन. चौधरी, डॉ. अरूणभाऊ देशमुख, डॉ. सत्यवान मेश्राम, मा. प्रमोद काळबांडे, मा. संध्या राजूरकर, मा. निरंजन मार्क॔डेयवार, प्राचार्य अंबादास तितरमारे, प्राचार्य गजानन मांडेकर, ऊर्मिला देवेन (जपान), मा. मनोज भारशंकर (अबुधाबी), डॉ. नितीन चव्हाण (ऑस्ट्रेलिया) ‘अक्षरक्रांती फाऊंडेशन’चे मा. शंकर घोरसे, मा. प्रशांत वाघ, मा. प्रमोदकुमार अणेराव, प्रा. पुंडलिक भामोदे व इतर मान्यवरांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *