अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड
1 min read

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड

Loading

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळाने अनुभवी व सामाजिक जाण असलेल्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
सुलोचनाताई वाघ या उच्चशिक्षित असून त्यांनी एम.ए., बी.एड. (मराठी व राज्यशास्त्र) पदवी संपादन केली आहे. सध्या त्या जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालिका म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून महिला दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. याशिवाय मानव अधिकार संरक्षण समिती, दिल्लीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदीही त्यांची निवड झाली असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
या निवडीबद्दल तिलोत्तमा पाटील, जयश्री पाटील, लीना पाटील, अलका पाटील, मंगला पाटील, सुनीता पाटील, कमल अक्का पाटील, मनीषा पाटील, माधुरी पाटील, भारती पाटील, डॉ. भारती (आधार संस्था), रागिनी पाटील, प्रभाताई पवार, पद्मजा पाटील, शीला पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकाळात महिलांसाठी आरोग्य, व्यवसाय, तसेच कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच तरुण मुला-मुलींना मार्गदर्शन, सहकार्य आणि महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *