प्रामाणिकतेचा आदर्श: बस प्रवासात हरवलेले ₹10 हजार सुरक्षित परत
![]()
प्रामाणिकतेचा आदर्श: बस प्रवासात हरवलेले ₹10 हजार सुरक्षित परत
अमळनेर प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकतेची उदाहरणे दुर्मीळ होत असताना, गडखांब येथे घडलेली एक घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. येथील रहिवासी कल्पना बाई संजय पाटील यांचे बस प्रवासादरम्यान हरवलेले ₹10,000/- (अक्षरी : दहा हजार रुपये) अखेर सुरक्षितपणे परत मिळाले आहेत.
दि. 13 मार्च 2026 रोजी प्रवास करत असताना ही रक्कम हरवली होती. मात्र, ही रक्कम सापडल्यानंतर केंद्रप्रमुख श्री. राजेंद्रसिंग वामनसिंग पाटील यांनी तत्परता दाखवत प्रामाणिकपणे पुढाकार घेत संबंधित रक्कम कल्पना बाई यांच्याकडे सुपूर्द केली.
या घटनेमुळे परिसरात समाधानाची लाट पसरली असून, “अजूनही समाजात प्रामाणिकपणा जिवंत आहे” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. केंद्रप्रमुखांच्या सकारात्मक आणि जबाबदार भूमिकेमुळे हे प्रकरण सुरळीत मार्गी लागल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
तसेच, या संपूर्ण घटनेत गजानन भक्त राजूबापू यांच्या कार्याचेही नागरिकांकडून विशेष कौतुक होत असून, त्यांच्या प्रामाणिकतेचा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.

