ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर  , समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान; ५ एप्रिल रोजी ग्रेटर नोएडा येथे पुरस्कार वितरण
1 min read

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर , समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान; ५ एप्रिल रोजी ग्रेटर नोएडा येथे पुरस्कार वितरण

Loading

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर

समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान; ५ एप्रिल रोजी ग्रेटर नोएडा येथे पुरस्कार वितरण

दिल्ली (प्रतिनिधी) :
समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया (SKF India) या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सेवाव्रती व्यक्तींना दिला जाणारा ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक व वृक्षमित्र ह.भ.प. डॉ. रवींद्र दिनकर भोळे (पुणे) यांना प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा ५ एप्रिल २०२६ रोजी टी.आय.आय.टी. कॉलेज परिसर, ग्रेटर नोएडा (दिल्ली) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे.

डॉ. भोळे यांनी गेली ३५ वर्षे वैद्यकीय, सामाजिक, अपंग सेवा, शैक्षणिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी निःस्वार्थ सेवा बजावली आहे. तसेच वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.

याच कार्यक्रमात दिघी (पुणे) येथील अमोल विष्णु पाटील यांनाही या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र बच्चन तसेच आयोजक सत्यनारायण प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

यावर्षी देशभरातून एकूण ५० मान्यवरांची ‘राष्ट्र गौरव पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली असून, त्यामध्ये बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या या मान्यवरांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *