ईद-उल-फित्र: अमळनेरमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन!
1 min read

ईद-उल-फित्र: अमळनेरमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन!

Loading

ईद-उल-फित्र: अमळनेरमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन!

अमळनेर प्रतिनिधी
​अमळनेर शहरात आज ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता, प्रगती आणि भाईचारा प्रस्थापित व्हावा, यासाठी प्रार्थना केली.
​सामूहिक नमाज: शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली हजारो हातांनी अल्लाकडे दुआ मागितली.
​मान्यवरांची उपस्थिती: आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ बी. एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर, गटनेते पंकज चौधरी, बाळासाहेब संदनशिव, श्रीराम चौधरी, कैलास पाटील, दादा पवार, नरेंद्र संदनशिव, नाना धनगर, संतोष लोहारे, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
​हिंदू-मुस्लिम एकता: नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि ‘शीरखुर्मा’ चा आस्वाद घेत अमळनेरच्या संस्कृतीची प्रचिती दिली.
​पूर्वजांचे स्मरण: नमाजनंतर कब्रिस्तानात जाऊन पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभो, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *