शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार
1 min read

शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार

Loading

शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी अरुण पाटील बिनविरोध
सविताताई पाटील यांची व्हाइस चेअरमनपदी निवड; संचालकांकडून सत्कार

शिरूड (प्रतिनिधी) : शिरूड विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. अरुण मनसाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाइस चेअरमनपदी सौ. सविताताई हरिश्चंद्र पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली.

या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून श्री. सुनील महाजन यांनी काम पाहिले. निवडीच्या वेळी संस्थेचे संचालक प्रा. सुभाष पाटील, भास्कर पाटील, बापूराव महाजन, धोंडू पाटील, सीताराम पाटील, गोरख धनगर, सुभाष महाजन, सखाराम मोरे, तिलोत्तमा पाटील, वासुदेव पाटील, मीराबाई पाटील, सचिव रवी पाटील तसेच सेल्समन वीरभान पाटील आणि राजेंद्र मोरे उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा कार्यकारी संचालक मंडळाच्या वतीने हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *