लोंढवे येथे 20 मार्चला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी
1 min read

लोंढवे येथे 20 मार्चला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी

Loading

लोंढवे येथे 20 मार्चला
मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजूंसाठी सुवर्णसंधी

अमळनेर प्रतिनिधी :
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या विद्यमाने तसेच कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, नंदूरबार यांच्या सौजन्याने लोंढवे (ता. अमळनेर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरातील गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

हे शिबिर शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता शनिमहाराज चौक, लोंढवे येथे पार पडणार आहे. शिबिरात नंदूरबार येथील अनुभवी नेत्रतज्ञांकडून तपासणी केली जाणार असून, मोतिबिंदू असलेल्या पात्र रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.

विशेष म्हणजे निवड झालेल्या रुग्णांसाठी राहण्याची, जेवणाची, प्रवासाची तसेच लेन्स व शस्त्रक्रियेची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य केली जाणार आहे. मात्र फिटनेस, डायबेटीस, बी.पी. आदी तपासण्यांचा खर्च रुग्णांना स्वतः करावा लागणार आहे.

लोंढवे, मंगरूळ, वाघोदे, निसरडी, खडके व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमासाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून डॉ. महेश रमण पाटील (अध्यक्ष, जायन्ट्स ग्रुप अमळनेर) कार्यरत असून, त्यांच्यासह अँड. राजेंद्र चौधरी, श्री. राजेंद्र भावसार, श्री. संदिप महाजन, श्री. आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच श्री. बाळासाहेब जीवन पाटील, श्री. अशोक शालीग्राम पाटील, आण्णासाहेब श्री. बन्सीलाल आसाराम भागवत आणि इतर सदस्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. महेश रमण पाटील (मो. ९९२२४७३७४२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जायन्ट्स ग्रुपच्या या उपक्रमामुळे आरोग्य सेवेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणार असून, समाजोपयोगी कार्याची ही आणखी एक प्रभावी नोंद ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *