NMMS परीक्षेत ब्राह्मणवेल विद्यालयाचा उज्ज्वल यश : ५०% निकालासह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
![]()
NMMS परीक्षेत ब्राह्मणवेल विद्यालयाचा उज्ज्वल यश : ५०% निकालासह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
धुळे प्रतिनिधी :
साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) इयत्ता आठवी सन 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी शाळेतून अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील एकूण ४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी २ विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेचा निकाल ५० टक्के लागला आहे. कु. तन्मय सूर्यवंशी (नागझिरी) याने ५९ गुण मिळवत उत्कृष्ट यश मिळवले, तर कु. युवराज पवार (नागझिरी) याने ५८ गुणांसह उत्तीर्ण होत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या यशामागे वर्गशिक्षक श्री. काशिनाथ माळी व श्री. हिरामण सोनवणे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. तुकाराम महाजन, संस्थासचिव श्री. एकनाथ महाजन, उपाध्यक्ष सौ. हौसाबाई महाजन तसेच सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बंशीलाल माळी, इंग्रजी शिक्षक श्री. बाजीराव निकुंभ, श्री. रविंद्र सूर्यवंशी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. चेतन महाजन, श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याशिवाय पालकवर्ग व ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

