कै. बळीरामदादा विद्यालयात विद्यार्थ्यांची फेर आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत उपक्रम; डॉक्टरांकडून आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
![]()
कै. बळीरामदादा विद्यालयात विद्यार्थ्यांची फेर आरोग्य तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत उपक्रम; डॉक्टरांकडून आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी : कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची फेर आरोग्य तपासणी करण्यात आली. मागील तपासणीवेळी अनुपस्थित राहिलेल्या तसेच नव्याने आजाराची लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची सखोल तपासणी यावेळी करण्यात आली.
या तपासणीसाठी डॉ. अमोल मासुळे, डॉ. मयुरी बच्छाव, डॉ. सोनाली गवळी व आरती अहिरे यांच्या पथकाने सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार दिले.
डॉ. अमोल मासुळे यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तर डॉ. मयुरी बच्छाव यांनी मुलींना वयात येताना घ्यावयाची काळजी, आरोग्याच्या समस्या व सकस आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. बन्सिलाल माळी यांच्यासह श्री. काशिनाथ माळी, श्री. बाजीराव निकुंभ, श्री. हिरामण सोनवणे, श्री. रविंद्र सूर्यवंशी, श्री. चेतन महाजन, श्री. पंडित खैरनार, श्री. सुनील ठाकरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाजीराव निकुंभ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. हिरामण सोनवणे यांनी केले.

