पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !.. , पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील.  ,सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर
1 min read

पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !.. , पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील. ,सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर

Loading

पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !..

पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील.

सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर

जामनेर प्रतिनिधी – रमेश वराडे

जामनेर – पहुर गावातील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक शिबिराचे प्रास्ताविक सत्यशोधक साळुबा पांडव यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच योगेश भडांगे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक तुषार बनकर, प्रमुख अतिथी बाबुरावजी घोंगडे (माजी सभापती प. स. ), सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजु जाधव, माळी समाजाध्यक्ष मधुकर बनकर, जळगाव जिल्ह्याध्यक्ष पी डी पाटील, महाराष्ट्रातील सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे ( चाळीसगाव ) , साळूबा पांडव ( छत्रपती संभाजीनगर ), शिवदास महाजन ( एरंडोल ) उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खंडेरायाची तळी भरून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाची भूमिका मांडून सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करणे ही काळाची गरज आहे. महापुरुषांचा इतिहास आपण समजून त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे. आपले विधी आपणच करावे पहुर येथील ऐतिहासिक प्रशिक्षण शिबिराचे कौतुक करून यापुढे पहुर गावात सत्यशोधक पद्धतीने विवाह होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्य सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षक भगवान रोकडे, साळुबा पांडव, व शिवदास महाजन यांनी प्रशिक्षणार्थींना सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने हळद, विवाह सोहळा, सत्यपूजा, गृहप्रवेश, दशपिंड विधी याचे प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले. प्रशिक्षणार्थी म्हणून सुकदेव गीते, बी टी नाडार , अशोक गोरे, दिपक बनकर यांची उपस्थिती होती. शिबिर स्थळी भोजनाची उत्तम व्यवस्था माजी पंचायत समिती सभापती बाबुरावजी घोंगडे यांनी केली.
याप्रसंगी माळी समाज माजी अध्यक्ष ज्ञानदेव करवंदे, सचिव मधुकर लहासे, शिवाजी राऊत, हरिश्चंद्र जाधव,ईश्वर हिवाळे, देवेंद्र घोंगडे , ज्ञानेश्वर महाराज,संदीप क्षीरसागर, पुंडलिक भडांगे, प्रशिक्षण शिबिराचे सूत्रसंचलन राजेंद्र सोनवणे तर आभार ईश्वर घोंगडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *