सामान्य कुटुंबातील वैष्णवी सूर्यवंशीची गगनभरारी; सरळ सेवा परीक्षेत कृषी अभिलेखा अधिकारी पदावर निवड क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र
![]()
सामान्य कुटुंबातील वैष्णवी सूर्यवंशीची गगनभरारी; सरळ सेवा परीक्षेत कृषी अभिलेखा अधिकारी पदावर निवड
क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र
अमळनेर प्रतिनिधी
कुमारी वैष्णवी सूर्यवंशी हे नानासाहेब अँड विजय नवल पाटील यांच्या संस्थेमध्ये कार्यरत कर्मचारी वृंदा मधील श्री प्रेमराज सूर्यवंशी यांची सुकन्या वैष्णवी सूर्यवंशी हिने सरळ सेवा परीक्षेमध्ये अभ्यास करून कृषी अभिलेखा अधिकारी या पदावर आपले गगन भरारी घेतलेली आहे .सामान्य कुटुंबातील परंतु मनस्वी असलेले दुर्दम्य इच्छाशक्ती व जीवनाला आकार देण्यासाठी सचोटीचे असणारी वर्तणूक याचा एक चांगला समन्वय या विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक कार्य काळामध्ये केला .म्हणूनच तिला नेत्र दीपक अशा प्रकारचे यश प्राप्त झाले .म्हणून क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय नवलनगर येथे माननीय ज्येष्ठ पत्रकार प्रा.सुनीलजी गरुड, प्रा, बापूसाहेब शामजी पवार, आबासाहेब श्री डी बी पाटील, आबासाहेब श्री डि.के पवार, मा.श्री उमेशजी काटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय उभाळे, प्रा. डॉ.यु.वाय. गांगुर्डे ,प्रा. डॉ.एन.झेड. पाटील डॉ.एस.जे. पाटील ,प्रा. डॉ .के.डी बागुल, प्रा.शिवाजी सूर्यवंशी, प्रा. विजय शिंदे, प्रा.सुजाता निकम ,प्रा. छाया पाटील सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या पावन उपस्थितीमध्ये व विद्यार्थ्यांच्या समवेत या गुणवंत व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून वैष्णवी सूर्यवंशी चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वैष्णवीने विद्यार्थ्यांना आपल्या अनुभव कथन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले व वैष्णवीच्या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांनी यश शिखर गाठलेले असून असाच प्रत्येकाचा भविष्यकाळ हा उज्वल होत जावा. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विजय शिंदे यांनी केले व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये कु. वैष्णवी सूर्यवंशी हिचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

