अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तिर्थक्षेत्रासाठी 2 कोटी 90 लाखांचा निधी , आमदार अनिल पाटील यांची माहिती, सभामंडप, डोम, सुशोभीकरण व विकासकामे लागणार मार्गी
![]()
अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तिर्थक्षेत्रासाठी 2 कोटी 90 लाखांचा निधी
आमदार अनिल पाटील यांची माहिती, सभामंडप, डोम, सुशोभीकरण व विकासकामे लागणार मार्गी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तिर्थक्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर झाला असून सदर निधीतून
मन्दिर परिसरात सभामंडप,डोम,सुशोभीकरण व पर्यटन संदर्भात विविध विकासकामे लागणार मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे आदेश दिनांक 11 मार्च रोजी प्राप्त झाले असून यात रणाईचे व भरवस येथील देवस्थानांचा समावेश आहे.यात रणाईचे येथील महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे-1 कोटी,रणाईचे येथीलच महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे-1 कोटी आणि रणाईचे येथील महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर परिसरात सभामंडप व डोम बांधकाम करणे-50 लक्ष,तसेच भरवस येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरात पर्यटन विषयक विविध विकासकामे करणे 40 लक्ष आदी 2 कोटी 90 लक्षच्या विकास कामांचा समावेश आहे.
अमळनेर तालुका तथा मतदारसंघात रणाईचे व भरवस हे महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र असून याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातुन महानुभाव पंथाचे अनुयायी येत असतात.आमदार अनिल पाटील हे देखील मोठ्या श्रद्धेने या परिवाराशी जुडलेले आहेत.सदर ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व मंदीर सुशोभीकरणसाठी निधी आवश्यक असल्याने रणाईचे येथील प.पु.प.म. वर्धनस्थ बिडकर बाबा महानुभाव व भरवस येथील प.पु.ढोकिकर बाबा विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती.याशिवाय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य श्री कारंजेकर बाबा,प्रकाशशेठ नन्नावरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महानुभव पंत च्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती.अखेर राज्यशासनाने या तीर्थक्षेत्रास निधी मंजूर करून भाविकांची मोठी सोय केली असून यामुळे रणाईचे व भरवस येथील दोन्ही तिर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
सदर निधीच्या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,
उपमूख्यमंत्री श्रीमती सूनेत्राताई पवार,जलसंपदामंत्री मंत्री गिरीषभाऊ महाजन, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्य मंत्री इंद्रनील नाईक व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

