ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, कर्मचारी प्रशंसा दिवस, जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व सत्कार
1 min read

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, कर्मचारी प्रशंसा दिवस, जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व सत्कार

Loading

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, कर्मचारी प्रशंसा दिवस, जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन व सत्कार

/ प्रतिनिधी
दि.१० मार्च २६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, दि.८ मार्च २६, व कर्मचारी प्रशंसा दिवस दिनाचे औचित्य साधून, अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस आणि जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ व ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच कर्मचारी प्रशंसा दिवस या उपक्रमात बँक शाखा, महिला बचतगट, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कामगार कल्याणकारी मंडळातील महिलांचा, तसेच तालुका अधिकारी, महसूल विभाग, शासकीय व निमशासकीय कार्यालये, राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अतनूर येथील कार्यक्षम आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला तहसीलदार सौ.मनिषा बाबूराव भगत (गायकवाड), पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले, सरकारी कामगार अधिकारी अविनाश अ. देशमुख, जळकोट कामगार अधिकारी आणि दुकाने निरीक्षक श्रेणी-१ च्या नवनियुक्त सौ.अर्चनाताई कांबळे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अधिकारी वानखेडे यांचा सन्मान देखील करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.जी. शिंदे-पाटील अखिल भारतीय असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी पत्रकार बालासाहेब शिंदे, पत्रकार संजय शिंदे अतनूरकर, लातूर जिल्हा युवक कुणबी सेनेचे उपाध्यक्ष एस.जी.शिंदे अतनूरकर, ग्राहक संरक्षण परिषदेचे महाराष्ट्र शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अतनूरचे शाखाधिकारी महेश प्रकाशराव ढेकाळे, बँक अधिकारी राहुल चव्हाण, रोखपाल अक्षयकुमार बागडी, संस्थेच्या सचिव सौ.संध्याताई शिंदे, बसवेश्वर महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.नागीण स्वामी, गंगामाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा बबिता बाबर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समितीचे संस्थापक राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, आशा कार्यकर्ती संघटनेचे नेते स्वाती रेड्डी-बिरादार आणि महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम राबवले गेले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, सर्व राष्ट्रीय महामानवाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिल्यानंतर, माहेर हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सौ. प्राजक्ता नितीन गुरूडे यांच्या वतीने गर्भाशय आणि स्तन कर्करोग जागरूकता अभियान राबवले गेले. व जवळपास अनेक महिलांना स्तन कर्करोग चाचणी व तपासणी का करावी याबाबत माहिती दिली.
उपस्थित महिलांना रोजगार कसा मिळवावा, घर आणि आपली इतर कामे सांभाळून आर्थिक उत्पन्न कसे वाढवावे याबद्दल महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहाय्यक कामगार अधिकारी तथा दुकाने निरीक्षक श्रेणी-१ च्या सौ.अर्चनाताई कांबळे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अधिकारी वानखेडे बँकेचे शाखाधिकारी महेश ढेकळे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समितीचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन व १५ मार्च जागतिक ग्राहक दिन, ग्राहकांचे हक्क व जबाबदाऱ्या या संदर्भात यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच लवकरच महिलांसाठी राष्ट्रीयकृत बँके द्वारे तसेच दत्तक गाव बँकेच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र, महिला स्वयंसहायता बचत गट याद्वारे रोजगार प्रशिक्षण सुरू करता येईल याची ग्वाही देखील त्यांनी दिली. तसेच महिलांचे आरोग्य विषयक माहिती व स्वच्छता अभियान देखील राबवले गेले. यामध्ये पुन्हा वापरता येण्याजोग्या सॅनिटरी पॅड्सबद्दल महत्त्वाचे मुद्दे: पर्यावरणपूरक: हे डिस्पोजेबल पॅड्ससारखा कचरा निर्माण करत नाहीत, ज्यामुळे प्रदूषण कमी होते, कालावधी: हे पॅड्स स्वच्छ धुवून आणि कडक उन्हात वाळवून अनेक वेळा वापरले जाऊ शकतात. Reusable Sanitary Pads कसे वापरावे याची माहिती, डॉ. गौतमी सचिन बांगे, डॉ.सायली मुळे आणि तज्ञांमार्फत देण्यात आली आणि नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले. शेवटी उपस्थितीना अल्पोपहार करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यामधे उपरोक्त स्वंयसेवी संस्था, महिला मंडळ, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था, बचत गट संस्थेबद्दल थोडक्यात माहिती, संस्थेमार्फत राबवले जाणारे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम याबद्दल देखील माहिती सांगितली गेली. प्रत्येक स्त्री मध्ये एक शक्ती दडलेली असते. वेळ असते ती फक्त स्त्री ने स्वतःमधली शक्ती ओळखण्याची. जेव्हा स्त्रीला याची जाणीव होते तेव्हा मात्र त्या स्त्रीला उंच भरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नेमके हेच काम, जिजामाता महिला मंडळ व वसुंधरा महिला मंडळ व सामाजिक संस्था करणार आहे. या संस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला तिच्या मध्ये दडलेल्या शक्तीला ओळखण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. जेणेकरून स्त्री आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या सक्षम होईल. उपस्थित मान्यवरांना तुळशीची रोपे देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपरोक्त स्वंयसेवी संस्था तसेच संस्थेच्या महिलांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *