शेळावे बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रंगतरंग-2026’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न  विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; रोख बक्षिसांनी गौरव
1 min read

शेळावे बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रंगतरंग-2026’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; रोख बक्षिसांनी गौरव

Loading

शेळावे बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रंगतरंग-2026’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; रोख बक्षिसांनी गौरव

पारोळा प्रतिनिधी :
ता. पारोळा येथील शेळावे बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत “रंगतरंग-2026” हे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 10 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच ताईसो. सौ. सुरेखा अरुण पाटील होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच निवृत्ती राजपूत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील तसेच पोलीस पाटील राजेंद्र बिऱ्हाडे यांची उपस्थिती लाभली.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे शानदार सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. दैवत छत्रपती, माझी शाळा मराठी, देवा काळजी रे, आया तुफान शेतकरी आत्महत्या, हिंदी रिमिक्स, देश रंगीला, ढगाचे घरटे, मंगळगौरी, स्वर्गात आकाशगंगा आदी विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. या सादरीकरणांना उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाविष्काराचे कौतुक करत ग्रामस्थांनी रोख बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. गावातूनही रोख स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच गावातील महिला-भगिनी, तरुण मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. योगिता सूर्यवंशी मॅडम, नितीन भारुटे सर, सुनील बडगुजर सर, गायत्री देसले मॅडम, गोपाल महाजन सर आणि सुनंदा बडगुजर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *