उद्योजकता संबंधी कार्यशाळा संपन्न* ●प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत Entrepreneurship Cell व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
![]()
*उद्योजकता संबंधी कार्यशाळा संपन्न*
●प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत Entrepreneurship Cell व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
—————————————–
दिनांक 9 मार्च २०२६ रोजी Entrepreneurship Cell व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे Acuitas TechComm LPP, पुणे येथील डॉ .रिजवान पिंजारी यांचे विद्यार्थ्यांना उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन मिळण्यासाठी महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत Challenges in Start-up and Opportunities in Entrepreneurship या विषयावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .हर्षवर्धन जाधव यांनी अतिथींचा सत्कार केला .प्रा. कल्याणी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांनी विषयाबद्दल माहीत देत प्रास्ताविक सादर केले. प्रा. वैशाली महाजन यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनीही मार्गदर्शनपर भाषणात कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ममता महाजन यांनी आभारप्रदर्शन केले.
डॉ .रिजवान पिंजारी यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, स्टार्ट-अप्समधील आव्हाने, नवोन्मेषाचे महत्त्व तसेच उद्योजकतेच्या क्षेत्रातील करिअर संधी याबाबत आपले मौल्यवान ज्ञान आणि अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. सत्र अत्यंत माहितीपूर्ण आणि संवादात्मक ठरले. विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप्स, व्यवसाय नियोजन आणि उद्योजकता विकासाबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबद्दलची जाणीव वाढली असून भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. दुपारच्या सत्रात ज्या विद्यार्थ्याच्या start up विषयी काही कल्पना आणि विषय होते त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना डॉ .रिजवान पिंजारी यांनी त्याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे सर, Entrepreneurship Cell विभागाच्या Coordinator डॉ.पुष्पा पाटील,डॉ रवि बाळस्कर, डॉ विवेक बडगुजर, डॉ निलेश चित्ते , प्रा उर्मिला वाघ, प्रा.निकिता पाटील, प्रा. नम्रता बडगुजर, प्रा. प्राची पारील, प्रा. रूपाली पाटील उपस्थित होते. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी, प्रा.वैशाली महाजन , प्रा.नूतन बडगुजर,प्रा.नेहा महाजन ,प्रा . आदित्य संकलेचा, प्रा.नेहा पाटील, प्रा.ममता महाजन, प्रा.कल्याणी पाटील ,प्रा.भावना महाजन, प्रा.दिव्या महाजन यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी मेहनत घेतली.

