सर्वधर्म समभावाचा संदेश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे अमळनेरमध्ये भव्य इफ्तार मिलन!”
1 min read

सर्वधर्म समभावाचा संदेश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे अमळनेरमध्ये भव्य इफ्तार मिलन!”

Loading

“सर्वधर्म समभावाचा संदेश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे अमळनेरमध्ये भव्य इफ्तार मिलन!”

अमळनेर (प्रतिनिधी):
पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून समाजात सामाजिक सौहार्द, परस्पर आदर आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उदात्त हेतूने, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (शाखा- अमळनेर) च्या वतीने भव्य ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य इफ्तार मिलन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “सर्वधर्म समभाव-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता” या ब्रीदवाक्याला अधोरेखित करणारा हा कार्यक्रम सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा सोहळा अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सोमवारी (१६ मार्च) सायंकाळी ५ वाजता संपन्न होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन समाजात एकता आणि बंधुभावाचा संदेश रुजवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यामध्ये:
खासदार स्मिता वाघ (जळगाव लोकसभा)
आमदार अनिल पाटील (अमळनेर विधानसभा)
मयुर भंगाळे (प्रांताधिकारी, अमळनेर)
शिरीष चौधरी (माजी आमदार)
रुपेशकुमार सुराणा (तहसीलदार, अमळनेर)
विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी)
दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक) आणि परिक्षित बाविस्कर (लोकनियुक्त नगराध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
तसेच अशोक पाटील(सभापती कृउबास), गणेश शिंदे(CO न पा), एन.आर. पाटील(BDO), डॉ. अनिल शिंदे(भाजपा) आणि जीभाऊ पाटील(स.पो.नि मारवड)यांसारख्या प्रमुख व्यक्तींची देखील उपस्थिती लाभणार आहे.

सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *