आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने कतृत्ववान माजी विद्यार्थिनींचा झांबरे विद्यालयात सत्कार*
![]()
*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने कतृत्ववान माजी विद्यार्थिनींचा झांबरे विद्यालयात सत्कार*
जळगांव प्रतिनिधी
आमच्या ए.टी झांबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यी मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. या मेळाव्याला २००३ -२००४ या वर्षांत या शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांनी आपल्या शाळेत आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती. प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे यांनी माजी विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह देत मनःपूर्वक स्वागत केले.आंतराष्ट्रिय महिला दिनानिमित्त याप्रसंगी कर्तृत्ववान विद्यार्थी श्रीमती.परवीन तडवी (तुरुंग अधिकारी येरवडा, पुणे),देवेंद्र काळे (डिफेन्स सर्विस),इंजिनिअर श्री.सचिन सपकाळे,रुपाली ओगले,रुपाली शिंदे, विपीन वाघ,प्रणाली गवळी,रवींद्र गवळी
या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगताना शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण यांचा भावनिक पद्धतीने शालेय जीवनात जगलेले सुवर्ण क्षणांचा उल्लेख केला.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला म्युझिक सिस्टीम शैक्षणिक साहित्य भेट दिले. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.
या मेळाव्यामुळे जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाला तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. अशा प्रकारे हा माजी विद्यार्थ्यी मेळावा आनंददायी व संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

