सौ. पुष्पलता खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा
![]()
सौ. पुष्पलता खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा
अमळनेर प्रतिनिधी :
साक्री तालुक्यातील कासारे येथील मूळ रहिवासी व सध्या मुक्काम सी-३०६, सी विंग, मंगेशी सृष्टी, हिना गार्डनच्या पाठीमागे, फेज-१, खडकपाडा (वेस्ट) कल्याण येथील सौ. पुष्पलता निंबादास खैरनार यांचे सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्या समाज बांधव श्री. प्रवीण निंबादास खैरनार (कल्याण) व श्री. महेंद्र निंबादास खैरनार (नाशिक) यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने खैरनार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
कै. पुष्पलताताई खैरनार यांची अंत्ययात्रा सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता राहत्या घरापासून निघून लाल चौकी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा आप्तपरिवार आहे. कै. पुष्पलताताई यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे.
खैरनार परिवाराच्या दुःखात श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, कल्याण शिंपी समाज तसेच महाराष्ट्र राज्य ‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ संघटना यांनी सहभाग नोंदवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

