अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार,  पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
1 min read

अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार, पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Loading

अमळनेरचे संदीप घोरपडे यांना ‘मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता’ पुरस्कार,

पी.आर.के. प्रतिष्ठानच्या संगमनेर येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी :
पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता के. बी. दादा देशमुख सभागृह, सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे उत्साहात पार पडला. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते हिरालाल पगडाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, ह.भ.प. विजय महाराज भोईरकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय फटांगरे, असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष जयराम ढेरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले, आदिवासी नेते सखाराम गांगड, अभिनेते व शिव व्याख्याते डॉ. सागर फापाळे, ह.भ.प. सुधाकर महाराज पाटील, पी.जे. रोहम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. किरण रोहम आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात हिरालाल पगडाल यांनी स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ काकड यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, पठार भागातील ग्रामीण शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. पुतळा डोंगरावर झालेल्या जंगल सत्याग्रहात सहभागी होऊन त्यांनी सरकारविरोधात असहकार पुकारला आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर सलग वीस वर्षे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य करताना त्यांनी ग्रामविकासासाठी मोलाचे कार्य केले.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी उपस्थित पुरस्कारार्थींना मार्गदर्शन करताना समाजकार्यात सातत्य, प्रामाणिकता आणि सेवाभावाची गरज अधोरेखित केली. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा प्रचार-प्रसार करणारे बुलढाणा येथील ह.भ.प. सुधाकर महाराज पाटील यांनी राष्ट्रसंतांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे असल्याचे सांगितले. यावेळी विजय महाराज भोईरकर व सीताराम राऊत यांनीही आपले विचार व्यक्त केले.

या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना “मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच अभिनेते व शिवप्रबोधनकार डॉ. सागर फापाळे यांना “डॉ. सुधीरजी तांबे धन्वंतरी पुरस्कार”, बुलढाणा येथील ह.भ.प. सुधाकर महाराज पाटील यांना “वारकरी रत्न”, शिरूर येथील विजय महाराज भोईरकर यांना “वारकरी भूषण” पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय मोहम्मद कैफ तांबोळी – आदर्श विद्यार्थी प्रतिनिधी, राजेंद्र गवांदे – आदर्श सरपंच, वैभव सदाकाळ – आदर्श शिक्षक, रामा पोकळे – आदर्श सरपंच, खंडेराव राऊत – आदर्श विश्वकर्मा, राधा चव्हाण – आदर्श व्यवस्थापक, कौतिक तांबे – आदर्श शिक्षक, भाऊसाहेब रहाणे – आदर्श सरपंच, विनोद गायकवाड – आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष, दीपाली फरगडे – आदर्श सरपंच, मंथन देसले – आदर्श शिक्षक, पांडुरंग वाकचौरे – आदर्श ग्रामपंचायत सदस्य, चित्राताई बांबेरे – आदर्श सरपंच, अमोल ढोले – आदर्श ग्रामपंचायत सदस्य, संजयकुमार शिंदे – आदर्श मुख्याध्यापक, मनोहर अभियेकर – आदर्श सामाजिक कार्यकर्ता, गोरक्षनाथ मदने – आदर्श पत्रकार, हनुमान सदाफळ – आदर्श शिक्षक, विजय पवार – आदर्श आरोग्य दूत, साईनाथ साबळे – आदर्श सामाजिक कार्यकर्ता, रमेश खेमनर – आदर्श शिक्षक आदी राज्यभरातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील अभियेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक संदीप काकड, गिरीश काकड व अंतोन मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *