पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा…
1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा…

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा…

अमळनेर प्रतिनिधी

दि.20 फेब्रुवारी रोजी पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे एक दिवसीय कप बुलबुल शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर व सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे एस पी वाघ सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांचा सत्कार पर्ल इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम(कॅप्टन व ADC गाईड जळगांव ) यांच्या हस्ते करण्यात आला. तर संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांचा सत्कार विजय चौधरी सर यांनी पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देवुन सत्कार करण्यात आला.
या वेळी कप बुलबुल शिबीर यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, ITI चे प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, सखाराम पावरा यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *