महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान , पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार
1 min read

महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान , पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार

Loading

महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार

अमळनेर प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सामर्थ्य प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत शासकीय सेवेत कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या आणि समाजात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांना यावेळी गौरविण्यात आले.

आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला आपल्या आयुष्यातील दुहेरी जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे सांभाळत आहेत. घर आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रांत सक्षमपणे उभे राहत समाजासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या अशा कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित महिलांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात अमळनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे, दामिनी पथकातील महिला पोलीस नम्रता जरे, तसेच मोनिका पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तत्पर असलेल्या पोलीस दलातील या महिला अधिकाऱ्यांच्या सेवाभावाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

तसेच आरोग्य क्षेत्रात रुग्णांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालत सेवाभावाने कार्य करणाऱ्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील नर्सिंग अधिकारी अर्चना चंद्रकांत ढाले यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांच्या आरोग्य सेवेमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल दिनेश माळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश देत महिलांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *