आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव, पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार
![]()
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव
पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार
अमळनेर प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील महिला शक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ग्रंथालयातर्फे पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचलित करण्यात येत असून, सध्या या केंद्रात शिक्षक बंधू-भगिनींसाठी मोफत टीईटी मार्गदर्शन वर्ग सुरू आहे. या वर्गाला उपस्थित असलेल्या महिला शिक्षिकांचा सन्मान आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन केंद्रात व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. अतुल सूर्यवंशी (पाचोरा) यांच्या हस्ते महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.
सन्मानित शिक्षिकांमध्ये सौ. प्राची आमोदकर, सौ. हर्षदा पाटील, सौ. प्रतिभा परदेशी, सौ. अर्चना चौधरी, कु. सोनाली अहिरे, सौ. प्रतिभा खैरनार, सौ. राजेश्वरी सोनवणे, सौ. नम्रता दोडकर, सौ. वंदना पाटील, सौ. सोनाली पाटील, श्रीमती मंगल नागरे, श्रीमती छाया जाधव, श्रीमती मंगला गायकवाड, श्रीमती योगेश्री पाटील, मोनिका लोखंडे, प्रज्ञा शिरूडकर, मेघा पाटील, माधुरी पाटील, संगीता बाविस्कर, श्रीमती योगिता शिंदे, श्रीमती कीर्ती सोनार यांचा समावेश होता.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ तसेच संचालक मंडळाच्या वतीने सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी केले.
.

