पूर्णवाद परिवाराच्या वतीने उदया पुरस्कार वितरण अमळनेर भूषण व सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा*
![]()
पूर्णवाद परिवाराच्या वतीने उदया पुरस्कार वितरण
अमळनेर भूषण व सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा*
अमळनेर प्रतिनिधी
जीवन कला संस्कार केंद्र अमळनेर व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अमळनेर भूषण पुरस्कार यंदा श्री ओमप्रकाशजी मुंदडा तर
घ. भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष
श्री डॉ.अविनाशजी जोशी यांना उदया रविवार दिनांक ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे संध्याकाळी ७ वाजता सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गुणेशजी पारनेरकर ,(अध्यक्ष गुरुसेवा मंडळ पारनेर) असून प्रमुख अतिथी म्हणून श्री भरतजी अमळकर,(अध्यक्ष, केशव स्मृती समूह,जळगाव) हे उपस्थित रहाणार आहेत.सदर कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ.अशोक रावेरकर यांनी केले आहे.

