इलेक्ट्रॉनिक्स विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांची वेलॉक्स ऑटोमेशन, सूरत येथे औद्योगिक भेट”*
![]()
“ *इलेक्ट्रॉनिक्स विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांची वेलॉक्स ऑटोमेशन, सूरत येथे औद्योगिक भेट”*
अमळनेर प्रतिनिधी-खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी Velox Automation, सूरत येथे शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी व अभ्यासक्रमातील संकल्पनांची उद्योगातील अंमलबजावणी समजावी हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.
वेलॉक्स ऑटोमेशन ही कंपनी औद्योगिक ऑटोमेशन, PLC, SCADA तसेच MVLV (Medium Voltage & Low Voltage) स्विचबोर्ड्स निर्मितीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेली असून, सुमारे ६०,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पामधून आपले कार्य संचलित करते. कंपनीचे कार्यक्षेत्र व उत्पादन क्षमता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रभावी ठरली.
भेटीदरम्यान कंपनीचे हेड HR इरफान अमन सर व नेहा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी औद्योगिक ऑटोमेशनची मूलतत्त्वे, PLC प्रोग्रामिंग, SCADA प्रणाली, कंट्रोल पॅनल डिझाइन, सेन्सर्स, ड्राइव्ह्स व स्विचबोर्ड्स निर्मिती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. इंडस्ट्री 4.0 आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना विविध ऑटोमेशन प्रकल्पांचे आणि स्विचबोर्ड निर्मिती प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाली. उत्पादन प्रक्रियेमध्ये अचूकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी ऑटोमेशन तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरते, याची सखोल माहिती देण्यात आली.
प्रश्नोत्तर सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी, आवश्यक तांत्रिक कौशल्ये, इंटर्नशिप व उद्योगातील अपेक्षा याविषयी मार्गदर्शन घेतले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सातत्याने कौशल्यविकास करण्याचे आणि उद्योगमान्य तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली. शैक्षणिक अभ्यास आणि औद्योगिक वास्तव यामधील दुवा दृढ करण्यास या उपक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली.
ही औद्योगिक भेट राष्ट्रीय उच्चतर शिक्षा विभाग (RUSA) यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित करण्यात आली. विभागामार्फत RUSA योजनेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या शैक्षणिक भेटीचे आयोजन विभाग प्रमुख डॉ. मुकेश भोळे, प्रा. वृषाली वाकडे, भगवान पाटील व पंकज भदाणे यांनी केले. विभागामार्फत कंपनीच्या व्यवस्थापनाचे, विशेषतः इरफान अमन सर व नेहा मॅडम यांचे तसेच RUSA योजनेचे मनःपूर्वक आभार प्रा. वृषाली वाकडे यांनी मानले.
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी व्हेलोक्स ऑटोमेशन, सूरत येथे शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी व अभ्यासक्रमातील संकल्पनांची उद्योगातील अंमलबजावणी समजावी हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.