रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार* , *शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन*
1 min read

रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार* , *शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन*

Loading

*रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार*

*शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन*

जळगाव – शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे नोबेल फाउंडेशन जळगाव तर्फे रविवारी दिनांक ०८ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता विनामूल्य महासेमिनारचे आयोजन विद्युत कॉलनी दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ नोबेल सभागृहात करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील, तसेच सेट परीक्षा उत्तीर्ण योगेश पाटील तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण जीवन सिसोदे आणि स्पर्धा परीक्षा तज्ञ जयदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
नोबेल फाउंडेशन तर्फे शिक्षकांना उन्हाळ्यात सुट्या असल्यामुळे टीईटी परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन करण्यात येत आहे .यासाठी शिक्षकांच्या निवास व भोजन व्यवस्थेची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे .या कोर्स अंतर्गत सीईटी परीक्षेची संपूर्ण तयारी या सोबत परीक्षेच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अत्यंत माफक शुल्कात हा कोर्स शिक्षक बंधू-भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे .याबाबत अधिक माहितीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *