जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान , निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन
![]()
जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी (आर. आर. सोनवणे)
जळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पर्यावरण परिषद व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा दि. १ मार्च २०२६ रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आमदार किशोरभाऊ दराडे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण, निसर्ग मित्र समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा साहित्यिक सुभाष सोनवणे (नगर), संस्थापक प्रेमकुमार आहिरे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, सार्वजनिक सेवा मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, राज्य उपाध्यक्ष सुभाष बिंदवाल, धुळे जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोरभाऊ दराडे यांनी निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी असून पर्यावरण रक्षणासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
परिषदेत पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याचा ठराव करण्यात आला. वृक्षलागवड, फटाकेमुक्त दिवाळी, ओझोन दिन, प्रदूषण नियंत्रण दिवस, पर्यावरणपूरक होळी, शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती, गुढीपाडव्याला कडुलिंब लागवड अशा उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.
या प्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रात पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
जीवन गौरव पुरस्कार
धुळे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भदाणे, भडगाव तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक प्राप्त प्रकाश अमृत पाटील आणि सेवानिवृत्त वन अधिकारी प्रभाकर वाघ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये
विनोद पवार (जळगाव), आरटीओ इन्स्पेक्टर गणेश पिंगळे, सुरसिंग पाटील, श्रीमती भिकूबाई सोनवणे (चोपडा), विद्यानंद पाटील (साक्री), दिलीप मनसाराम पाटील (निंभोरा, भडगाव), साखरचंद कांकरीया (ताहराबाद), प्रदीप गहीवरे (शिरपूर), राजेश पवार (बडोदा), प्रसाद दौंदळ (साक्री), प्रा. डॉ. ज्ञानेश्वर निकम (दिंडोरी), सयाजी देवरे (सटाणा), राकेश पाटील (भडगाव), शालिनी भामरे (साक्री), डॉ. विशाल बिंदवाल (जळगाव), वसंत चव्हाण (धुळे), अमोल घुगे (जळगाव), चंद्रकांत मोरे, सोमनाथ माळी (चाळीसगाव), शोभा जाधव (दिंडोरी), सुमन विटकर, चंद्रकांत पाटील (चोपडा), अजिंक्य लता सोनवणे (पैठण), मनिषा पाटील, कल्पना देवरे, शिवदास गव्हाळे (जामनेर), वसंत भामरे (शिरपूर), हेमंत बेहेरे (नाशिक), अमोल सोनार, पल्लवी मांडोळे (धुळे), वैशाली बारी (शिरपूर), गणेश चौधरी, जयेश लक्ष्मणभाई (नंदुरबार), नथ्थू पाटील (शिंदखेडा), योगेश पाटील (शिंदखेडा) आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. आर. सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. राजेंद्र घोलप, विश्वास पगार, विनोद पवार, सुरसिंग पाटील, धनराज पाटील, प्राचार्य आर. एन. पाटील, डॉ. वाल्मीक आहिरे, विनोद पाटील, नामदेवराव तुपे, कर्नल प्रा. शिवाजीराव पाटील, अक्षय पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने समाजात सकारात्मक जागर निर्माण करणारा हा सोहळा ठरला, अशी माहिती संस्थापक प्रेमकुमार आहिरे, जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील व अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

