उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ   महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात
1 min read

उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात

Loading

उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ

महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर आदिवासी ठाकूर जमातीतील महिलांनी पारंपारीक पद्धतीने विधिवत होळी पेटवून कुटुंबाच्या व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करून
समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीने शिमगा उत्सवाला सुरुवात केली आहे.
ठाकूरांच्या होळीत उंबराचा दांडा उभा करून होळी रचली जाते.शहरात राहूनही पारंपरिक उत्सवातून पिढ्यानपिढ्या संस्कृतीचे जतन ठाकुरांमध्ये केले जाते. वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने अमळनेरमध्ये ठाकूर समाजातर्फे सामूहिकपणे होळी साजरी करण्याची प्रथा जोपासली जात आहे .अमळनेरच्या टाऊन हॉल च्या मैदानात ‘ होळी रे होळी’ च्या गजरात होळीला
ठाकूर जमातीच्या महिला मंडळातर्फे खण,नारळ अर्पण केले. यावेळी रंगीत पताका, फुगे लावून, रांगोळी काढून होळीचा परिसर सजवला होता.
महिला प्रमुख मिनाताई ठाकूर,
कोषाध्यक्ष अपेक्षा पवार,उपाध्यक्ष बेबिताई ठाकूर,सौ.हिराबाई ठाकूर यांचेसह महिलांनी होळीची विधिवत पूजा करून ओटी , नवैद्य अर्पण करीत पूजन करून होळीला अग्नी दिला.यावेळी ठाकूर समाजाचे अमळनेर जमात प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सरचिटणीस, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे,सचिव प्रकाश वाघ, गुणवंत वाघ, दिलीप वानखेडे, चंद्रशेखर ठाकूर, अरूण चव्हाण,मच्छिंद्र बागुल,अनिल ठाकूर ,धनराज ठाकूर ,प्रकाश ठाकूर, लीलाधर ठाकूर आदिंनी होळीला हारडा हार-कंगन, पुष्प अर्पण करून पूजन केले.आदिवासी ठाकुरांमध्ये पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.समाज बांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती फेर धरला.तर
होळीचा प्रसाद म्हणून उपस्थिताना गुळाची जिलेबी यावेळी वाटप करण्यात आली.
यावेळी यशवंत सूर्यवंशी,देविदास ठाकूर, कुणाल ठाकूर, हेमंत ठाकूर, विजय ठाकूर ,वामन चव्हाण, भैया ठाकूर, अनिल ठाकूर, वेलचंद ठाकूर , उमाकांत ठाकूर ,संजय सूर्यवंशी, सतिष ठाकूर,गजानन ठाकूर, सचिन ठाकूर,चंद्रकांत ठाकूर, तेजपाल ठाकूर ,उमेश शंकपाळ, काशिनाथ ठाकूर , शुभम ठाकूर ,हेमंत ठाकूर , राजेंद्र ठाकूर, सुरज ठाकूर, मनोज ठाकूर ,दीपक देविदास ठाकूर , ऋषिकेश ठाकूर,अजय ठाकूर, मुकेश महाले , तांबेपुरा, रोहित ठाकूर यांचेसह महिला मंडळाच्या भगिनी आशा ठाकूर,भारती ठाकूर,संगीता ठाकूर, स्वाती ठाकूर,प्रियंका ठाकूर, मनीषा ठाकूर,मंगल ठाकूर, संगीता ठाकूर, रुपाली ठाकूर, दिपाली ठाकूर, कल्पना ठाकूर,गायत्री ठाकूर, वर्षा पवार, प्रतिभा पवार, दुर्गा सुर्यवंशी, शांताबाई पवार, पल्लवी ठाकूर,नेहा ठाकूर, बेबीताई ठाकूर, रत्ना प्रभा ठाकूर , तेजस्विनी ठाकूर, आशा ठाकूर, स्नेहा ठाकूर,विजया ठाकूर, मिना ठाकूर,मंगला ठाकूर आदींसह मोठ्यासंखेने बाळ गोपाल उपस्थित होते. यावेळी टाऊन हॉल परिसरातील रहिवासांनीही होळीचे पूजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *