खानदेश शिक्षण संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा भौगोलिक अभ्यास दौरा उत्साहात संपन्न*
1 min read

खानदेश शिक्षण संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा भौगोलिक अभ्यास दौरा उत्साहात संपन्न*

Loading

*खानदेश शिक्षण संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा भौगोलिक अभ्यास दौरा उत्साहात संपन्न*

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागामार्फत दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय भौगोलिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. सदर दौऱ्यात बी.ए. आणि एम.ए. च्या एकूण ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा अभ्यास दौरा राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियान व प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
भूगोल विषयातील मूलभूत भौगोलिक संकल्पना या केवळ प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून अधिक अचूक व मौल्यवान ज्ञानवर्धक अनुभवातून समजत असतात.
हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व अनुभवसमृद्ध ठरला असून भूगोल आणि इतिहासाच्या परस्परसंबंध प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची मौल्यवान संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
प्रस्तुत अभ्यास दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील बिजासनी माता मंदिर येथे दर्शन व स्थळपरिचयाने करण्यात आली. हे मंदिर सातपुडा उंच डोंगररांगेवर वसलेले असून परिसरातील भौगोलिक रचना, उंची, उतार, वनस्पती आच्छादन तसेच स्थानिक वसाहतींची मांडणी यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. सातपुडा डोंगराळ प्रदेशातील धार्मिक स्थळांची स्थाननिश्चिती व त्यामागील भौगोलिक कारणे समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी महेश्वर येथे भेट दिली. नर्मदा नदीच्या काठी वसलेले हे ऐतिहासिक शहर भौगोलिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे विद्यार्थ्यांनी राणी अहिल्याबाई होळकर यांचा किल्ला, राजवाडा, निवासस्थान, महादेव मंदिर तसेच नर्मदा नदीवरील घाट व त्यांचा पुतळा पाहिला. नर्मदा नदीच्या प्रवाहाची दिशा, घाटांची रचना, पूररेषा, नदीकाठावरील वस्तीची मांडणी व जलस्रोतांचा वापर या सर्व बाबींचे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी मांडवगड (मांडू) येथे भेट देऊन तेथील पठारी प्रदेशावरील वसाहतींची रचना, नैसर्गिक तटबंदी, उंचसखल भूभाग, प्राचीन जलसंधारण पद्धती व जलव्यवस्थापन प्रणाली आणि ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास केला. राणी रूपमती महाल, जहाज महाल, जल महाल व हिंडोला महाल या वास्तूंचे ऐतिहासिक तसेच भौगोलिक महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
सदर भौगोलिक अभ्यास दौरा प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, डॉ. मुकेश भोळे, विभागप्रमुख डॉ. कैलास निळे, डॉ. किरण गावित व डॉ. प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सहल प्रमुख डॉ. महेंद्र महाजन, प्रा. भुषण पवार, प्रा. अमित शिरसाठ, प्रा. चंद्रशेखर वाढे, प्रा. चंद्रकांत जाधव व प्रा. प्रितम पावरा यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला व परिश्रम घेतले. खानदेश शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल भूगोल विभागाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *