शासनाने शिक्षण संस्था चालकांना वेठबिगार समजू नये , राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांची माहिती
1 min read

शासनाने शिक्षण संस्था चालकांना वेठबिगार समजू नये , राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांची माहिती

Loading

शासनाने शिक्षण संस्था चालकांना वेठबिगार समजू नये

राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांची माहिती

अमळनेर – राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून अनुचित प्रकार घडल्यास अथवा कॉपी केस झाल्यास मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. हा आदेश शासनाने पारित केला आहे. त्या आदेशाला संस्थाचालकांचा विरोध आहे.परीक्षेशी संस्थाचालकांचा काही एक संबंध नसून सदरील परीक्षेत परिक्षार्थीकडून चुका घडतात. आणि त्याची शिक्षा संस्थाचालकांना का? हा तुघलकी आदेश तात्काळ रद्द करावा. शासनाने संस्थाचालकांना सन्मानाने वागावे, अशी माहिती राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केले आहे.
संपूर्ण राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून या परीक्षा विविध मंडळामार्फत घेतल्या जातात. परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात कॉपीचे निर्मूलन व्हावे. शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी ही बाब आवश्यक आहे. परीक्षेच्या दरम्यान संस्थाचालक परीक्षेसाठी आपल्या इमारती उपलब्ध करून देतात. शासनाला सहकार्य करतात. एखा‌द्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून अनुचित प्रकार घडल्यास अथवा कॉपीकेस झाल्यास मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. हा आदेश शासनाने पारित केला आहे. त्या आदेशाला संस्थाचालकांचा विरोध असून जेव्हा परीक्षा संदर्भात बैठका घेतल्या जातात. त्या बैठकीत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित राहतात. तिथे संस्थाचालकांना बोलवले जात नाही.परीक्षेशी संस्थाचालकांचा काही एक संबंध नसून सदरील परीक्षेत परिक्षार्थीकडून चुका घडतात. आणि त्याची शिक्षा संस्थाचालकांना का? हा तुघलकी आदेश तात्काळ रद्द करावा. शासनाने संस्थाचालकांना सन्मानाने वागावे, यासाठी येत्या 28 मार्च 2026 ला राज्य शिक्षण संस्था महामंडळाची कार्यकारणी या विरोधात शासनाकडे निवेदन देऊन संस्था चालकांची बाजू मांडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी संस्था चालकांनी राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या भूमिकेला समर्थन द्यावे, अशी ही माहिती श्री पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *