असोदा सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक शिबिर उत्साहात
![]()
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक शिबिर हरित सेनेचे गोपाळ महाजन यांनी घेतले.
कोणकोणत्या रसायनापासून कोणते रासायनिक रंग तयार होतात व त्यापासून काय दुष्परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती गोपाळ महाजन यांनी दिली. तसेच रंगपंचमीचे वैज्ञानिक महत्त्व विशद केले.पडस, झेंडू, गुलाब, आस्टरची फुले, बीट, पालक यापासून नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच कोरडे रंग कसे बनवतात याबद्दल सविस्तर माहिती दिली.
मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी रंग खेळताना आपल्यामुळे इतरांना इजा होणार नाही याची काळजी घ्या व नैसर्गिक होळी खेळा असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आठवी चा भावेश पाटील या विद्यार्थ्याने भूषवले . सूत्रसंचालन प्रेमराज बऱ्हाटे यांनी तर आभार वृषाली चौधरी यांनी मानले. व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री एल जे पाटील,मंगला नारखेडे शुभांगीनी महाजन, उपेंद्र चौधरी सचिन जंगले उपस्थित होते.

