विद्यार्थी सुरक्षेसाठी बदलापुर येथे पोलीस व शिक्षण विभागाची संयुक्त सभा*  *प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात गांभीर्याने काळजी घेऊन परिवहन समितीचे सर्व नियम आणि अटी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे ::शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*
1 min read

विद्यार्थी सुरक्षेसाठी बदलापुर येथे पोलीस व शिक्षण विभागाची संयुक्त सभा* *प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात गांभीर्याने काळजी घेऊन परिवहन समितीचे सर्व नियम आणि अटी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे ::शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*

Loading

*विद्यार्थी सुरक्षेसाठी बदलापुर येथे पोलीस व शिक्षण विभागाची संयुक्त सभा*

*प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात गांभीर्याने काळजी घेऊन परिवहन समितीचे सर्व नियम आणि अटी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे ::शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
शालेय विद्यार्थिनींवर वारंवार होत,असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात, विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अंबरनाथ तालुका शिक्षण विभाग व पोलीस विभाग यांची तातडीची सभा बदलापुरात संपन्न झाली.
विद्यार्थिनींच लैंगिक शोषण व अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत असल्याने शाळेतील प्रशासनाला, शिक्षकांना विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात काळजी घेणे, परिवहन समितीचे सर्व नियम आणि अटी काटेकोर पालन करणे, वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा,या संदर्भात 13 मे 2025 रोजीच्या शासन आदेशावर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापकांना शिक्षकांना अत्यंत उत्कृष्ट भाषाशैलीमध्ये मार्गदर्शन केले.
लैंगिक शोषणापासून बालक संरक्षण, शाळेतील तक्रार पेटीची योग्य दखल, शाळेचा सुरक्षा रक्षक , शाळांमध्ये सती सावित्री गट स्थापन करणे , शाळामध्ये सीसी टीव्ही चालू असणे, बालकांना शाळेत सोडणाऱ्या बस व्हॅन रिक्षा चालवणाऱ्या वाहन चालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र असावे.बसेस (bus) ची पडताळणी , GPRS सुविधा, शाळेत मुलांना ने आण सोडणाऱ्या शाळेची गाडी RTO द्वारे permission (NOC) घेतलेली असावी, शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडताना पालकांच्या नजरेखालीच सोडणे अशा विविध प्रकारच्या वाहन सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत काळजी घेण्याचे आदेश दिले.
*यावेळी बदलापूर नगरपालिका नगराध्यक्षा सौ.रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा सौ. प्रियंकात दामले, एसीपी शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिंदे, क्राईम पोलीस निरिक्षक दिनकर पगारे, गट शिक्षणाधिकारी विशाल पोतेकर, केंद्रप्रमुख सोळसे सर, जामनिक सर उपस्थित होते..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *