ए.टी. झांबरे विद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन*
![]()
*ए.टी. झांबरे विद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन*
जळगाव: स्थानिक ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ आणि कवी कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी थोर कामगार कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, कार्यक्रमात त्यांच्या साहित्याचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा लोहार आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख निर्मल चतुर उपस्थित होते. रफीक तडवी सर यांनी आकर्षक फलकलेखन केले होते.
या संपूर्ण सोहळ्याचे कल्पक नियोजन आणि उत्कृष्ट संयोजन रत्नमाला शिंदे यांनी केले होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संगीतमय साहित्याचा आविष्कार घडवला. ‘लाभले आम्हास भाग्य’ हे गौरवगीत मृणाल सुरवाडे, मृणालिनी सूर्यवंशी, निधी जगताप, मिताली वानखेडे, वैष्णवी चौधरी आणि सलोनी प्रजापती यांनी सादर केले. तर ‘ही मायभूमी ही जन्मभूमी’ हे गीत ऐश्वर्या पाटील, दिशा धाडे, सृष्टी लंके, खुशी खैरनार, महिमा पाटील, नम्रता पाटील, मानसी नन्नवरे आणि मोक्षिता पाटील यांनी सादर केले. या गीतांना सहज फेगडे (तबला) व ईशान भालेराव (पेटी) यांनी साथसंगत केली.
तसेच केतन पाटील, नूतन बारी, स्वरा कुलकर्णी, स्नेहल पोतदार, अनुश्री चौधरी आणि गुंजन ढाके यांनी नामवंत साहित्यिकांच्या रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिनाक्षी इसे मॅडम यांनी केले, तर सूत्रसंचालन काव्या फेगडे व मनाली पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

