लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय
1 min read

लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय

Loading

 

लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय

कल्याण :(प्रतिनिधी:सुनील इंगळे )लेवा स्पोर्ट्स क्लब अंबरनाथ मार्फत लेवा प्रीमियम लीग तसेच लेवा युनिटी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लेवा पाटीदार समाज मंडळाच्या विविध शहरातील विविध संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता, त्या अंतर्गत अंबरनाथच्या तीन टीम, बदलापूर, जळगाव,कल्याण, उल्हासनगरच्या प्रत्येकी दोन-दोन अशा संघांनी सहभाग नोंदवला होता.लेवा पाटीदार समाज कल्याण मंडळातर्फे या स्पर्धेत सरदार इलेव्हन संघाने विजय नोंदवून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला,अगदी अटीतटीच्या फेरीत सरदार इलेव्हन संघाने आपली दिमागदार कामगिरी कायम ठेवत उल्हासनगर संघाचा प्रभाव करत आपले नाव या चषकावर कोरले. यशस्वी सरदार इलेव्हन संघाचे खेळाडू पुढील प्रमाणे कर्णधार अंकित झोपे, निखिल इंगळे,पंकज जावळे,लुकेश भिरूड, शैलेश चौधरी,रोशन,गिरीश भारंबे,रितेश सरोदे,शुभम चौधरी,कुणाल झोपे या वीरांनी सरदार इलेव्हन संघाचा गड लढून अंतिम विजय प्राप्त केला त्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करून या गौरवशाली आयोजनाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *