केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती
1 min read

केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती

Loading

केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश

स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती

धुळे, प्रतिनिधी
राज्यातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संघटनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याध्यक्ष तथा शिक्षक नेत्या मा. शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांसाठी स्वतंत्र कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून धुळे जिल्हाध्यक्षपदी श्री. महेश दगडू पवार यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

राज्यात अपंग शाळांमध्ये समावेशित शिक्षण पद्धती अंतर्गत कार्यरत असलेले हजारो विशेष प्रशिक्षित शिक्षक मागील सुमारे वीस वर्षांपासून सेवा बजावत होते. मात्र शासनाच्या धोरणात्मक त्रुटींमुळे अनेक शिक्षकांना नियमित वेतनापासून वंचित राहावे लागले. या अन्यायाविरुद्ध शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलने केली व शासनाच्या शाळांमध्ये समायोजन करून वेतन सुरू करण्याची मागणी सातत्याने लावून धरली.

या मागणीस महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी केवळ नैतिक पाठिंबा दिला नाही, तर प्रत्यक्ष पुढाकार घेत शिक्षण संचालक, आयुक्त, शिक्षणाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजनासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न करत संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रक्रिया गतीमान केली.

या पार्श्वभूमीवर केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये प्रवेश केला. शिक्षकांच्या हक्कासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी ‘महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संलग्न केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (स्पेशल टीचर्स असोसिएशन)’ची स्थापना करण्यात आली.

धुळे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार —

  • जिल्हाध्यक्ष : श्री. महेश दगडू पवार
  • जिल्हा उपाध्यक्ष : अमरदीप सुकलाल वानखेडकर
  • सचिव : तेजेश भालेराव सोनवणे
  • सहसचिव : विशाल यशवंतराव शिसोदे
  • प्रसिद्धी प्रमुख : जिजाबराव रामभाऊ माळी
  • जिल्हा कार्यकारणी सदस्य : ललित प्रभाकर भामरे, दलपत भीमसिंग गिरासे
  • महिला प्रतिनिधी : श्रीमती मनीषा दामोदर पाटील व श्रीमती हर्षाला अरुण गिरणार

कार्यक्रमात बोलताना शुभांगी ताई पाटील यांनी सांगितले की, “या लढ्यात मी वेळोवेळी तुमच्या पाठीशी उभी राहिले आहे आणि यापुढेही संघटना केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील.”

नूतन जिल्हाध्यक्ष महेश पवार यांनी संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत, लवकरच प्रत्येक जिल्हा व तालुक्यात कार्यकारणी स्थापन करून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा विश्वास दिला.

या प्रवेश सोहळ्यात महेश दगडू पवार, ललित प्रभाकर भामरे, ऋषिकेश भटू वाघ, विजेंद्र दिलीप सूर्यवंशी, जिजाबराव रामभाऊ माळी, अमरदीप सुकलाल वानखेडे, तेजस भालेराव सोनवणे, विशाल विठ्ठल पाटील, कुणाल रामचंद्र पाटील, वासुदेव भटा पाटील, वीरेंद्र सूर्यवंशी, आत्माराम सैदाने, गिरीश अंबर महाले, दिनेश अण्णाजी देवरे, गोकुळ मनसाराम पाटील, विजय शामराव पाटील, अमोल सुभाष पाटील, गोकुळ पाटील, गोपाल रामभाऊ पवार, राजेंद्र दगडू वाडीले, अश्विनी कारभारी धोंडगे, मनीषा पाटील, सारिका खैरे, प्रतिभा अहिरे, सुनीता पाटील, रोहिणी पाटील यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

या ऐतिहासिक निर्णयामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांच्या हक्काच्या लढ्याला नवे बळ मिळाले असून संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *