श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियान; 150 निरंकारी सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग*
1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियान; 150 निरंकारी सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग*

Loading

*श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियान; 150 निरंकारी सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग*

प्रतिनिधी अमळनेर…
22 फेब्रुवारी रविवार अमळनेर येथील संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट अमृत या सर्वव्यापी उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यात अमळनेर शाखेच्या वतीने श्री मंगळ ग्रह देवस्थान आणि परिसर या ठिकाणी रविवारी सकाळी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले .*स्वच्छ जल स्वच्छ मन* या संकल्पनेतून प्रेरित या अभियानात सुमारे दीडशे तर 200 स्वयंसेवकांनी ऊतस्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यात योगदान दिले सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जन्मदिवस निमित्त आयोजित या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षण बरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता. सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वयंसेवकांनी मंगळ ग्रह परिसरातील प्लास्टिक कचरा, साचलेली घान, इतर टाकाऊ वस्तु, गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला या अभियानात अमळनेर शाखेचे प्रमुख आ. श्रीचंद निरंकारी ,सेवादल इंचार्ज जितेंद्र डिंगराई आणि निरंकारी सेवादल यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्वच्छता ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आध्यात्मिक शिस्तीचा एक भाग आहे असा संदेश देण्यात आला अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळत असून समाजात स्वच्छतेची सवय रुजण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात जलस्त्रोत, सार्वजनिक स्थळे व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या संकल्प करण्यात आला असून अंमळनेर शाखेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष श्री डीगंबर महाले सर यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत त्या ठिकाणी सेवेदार्‍यांना चहा नाश्त्याचे व्यवस्था करून या ठिकाणी संत निरंकारी मिशन चे कौतुक करत मंगळ ग्रह संस्थान तर्फे आभार व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *