केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा* *जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न*
![]()
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा*
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न
जळगाव दिनांक 23 फेब्रुवारी ( जिमाका वृत्तसेवा )-: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या व सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपवनसंरक्षक जमीर शेख, राम धोत्रे तसेच भुसावळ , रावेर, नशिरबाद, फैसपुर, वरणगावचे नगराध्यक्ष उपस्थित होते.
केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी रेल्वे विभागाच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजने अंतर्गत प्रस्तावित कामांसदर्भात सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता समन्वयाने कामे पुर्ण करावीत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठरवून दिलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत मध्य रेल्वे विभागातर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. अमृत भारत, वन स्टेशन-वन प्रोडक्ट, आदी महत्वाच्या प्रकल्पाच्या कामांचा यावेळी आढावा त्यांनी घेतला.
सुरक्षिततेचे निकष पाळणे गरजेचे असून स्थानिक परिस्थितीचा विचार करून कामे पूर्ण करावीत, काही ठिकाणी रेल्वे पुलांच्या जॉईंट एलिमेंट्सच्या दुरुस्तीबाबतही सूचना त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्यात.
बैठकीत रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, जलजीवन मिशन, ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी, आरोग्य व शिक्षण विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी घेतला.
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतील सहभाग लक्षात घेता विविध योजनांच्या कामासंदर्भात जिल्ह्यातील खासदारांसमवेत चर्चा करण्यात यावी. तसेच कामांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार व आमदार दोघांनाही प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कामांचे प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल तयार करावा, जेणेकरून समन्वयातून कामे वेळेत पुर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विविध विकासकामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत विकासकामांच्या गतीसाठी समन्वय, पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग यावर विशेष भर देण्यात आला.


बैठकीला सर्व संबधित विभागांचे प्रमुख, तहसिलदार, नगर पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

