SQAAF मध्ये ‘अ+’ मानांकनाची ऐतिहासिक कामगिरी; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका!
![]()
SQAAF मध्ये ‘अ+’ मानांकनाची ऐतिहासिक कामगिरी; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका!
अमळनेर प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनात राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाला मानाची ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालयास पहिल्याच फेरीत “अ +” श्रेणी प्राप्त झाली आहे ही गौरवास्पद बाब आहे आणि महाराष्ट्रात खूपच कमी कनिष्ठ महाविद्यालयांना पहिल्या फेरीत “अ +” श्रेणी प्राप्त झाली आहे त्यात राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा चा समावेश आहे. ही कामगिरी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयीन संपूर्ण टीमचे परिश्रम, नियोजन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, स्वच्छ व सुसज्ज महाविद्यालय परिसर आणि पालक-शिक्षक सहकार्य यामुळेच हा मानाचा मुकुट महाविद्यालयाला मिळाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श म्हणजे राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय होय. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) चे समन्वयक डॉ. ईश्वर एस. पाटील, सहा क्षेत्रांचे चेअरमन श्री. पी. पी. पाटील, श्री. ए. ए. मोरे, श्री. एन. व्ही. पाटील, सौ. एम. आर. नेरकर, श्रीमती एस. बी. साळुंखे, डॉ. एन. एन. पवार आणि सर्व समितीतील सदस्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालयीन काम पाहणारे श्री. पी. एस. पाटील, शिपाई शिवाजी पाटील, दीपक भिल या सर्वांनी खूप मेहनत घेतली. हे सर्व काम रात्रंदिवस एक करून प्रथम मुदतीतच पूर्ण केले. त्यानंतर शासनाकडून बाह्यमूल्यांकन समिती गठीत करून संपूर्ण दिवसभर या समितीने 1. अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन, 2. पायाभूत सुविधा, 3. मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व, 4. समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव, 5. व्यवस्थापन, सनियंत्रण आणि प्रशासन, 6. लाभार्थ्यांचे समाधान या सहाही क्षेत्रांची पाहणी, पडताळणी करून शासनास गोपनीय अहवाल सादर केला. त्यातून राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयास “अ+” श्रेणी प्राप्त झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचा विकास करत असताना प्राचार्य, संस्थेचे चेअरमन मा. वसंतराव मोरे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी उपनगराध्यक्ष मा. रोहन मोरे, संचालक मा. पराग मोरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक जळगाव, पारोळा गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील, केंद्रप्रमुख रामकृष्ण बाविस्कर, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व कर्मचारी यांचेही मार्गदर्शन लाभले. राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. SQAAF “अ +” श्रेणी म्हणजे अभिमान राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचा आणि गौरव शिक्षणाचा. SQAAF “अ +” श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल शासनाने अभिनंदन केले आहे. संस्थेचे चेअरमन, संचालक, प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे तसेच सर्वच स्तरावरून राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

