अध्यात्मिक उन्नतीसाठी महाशिवरात्रीचे व्रत महत्त्वाचे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह. भ .प डॉ. रवींद्र भोळे
![]()
अध्यात्मिक उन्नतीसाठी महाशिवरात्रीचे व्रत महत्त्वाचे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह. भ .प डॉ. रवींद्र भोळे
पुरंदर (वाघापूर श्री माणकेश्वर मंदिर): महाशिवरात्री महत्त्वाकांक्षी साधकांसाठी अत्यंत स्फूर्तीदायक आहे. ह्या दिवशी नवीन स्फूर्ती मिळते. या दिवशी शिवाने सर्व शत्रूवर विजय मिळविला. नवोदित वधू-वरांना हा दिवस रहस्यमय, जीवनात तडजोड करायला शिकवितो. योग्यांना योग सामर्थ्य मिळते.संसार रुपी दुःखातील विष प्राशन करून नवीन चेतना निर्माण व्हावी असा महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस आहे. नवीन चेतना निर्माण होण्यासाठी व अध्यात्मिक उन्नतीसाठी महाशिवरात्री व्रत अत्यंत महत्त्वाचेआहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार
डॉ रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री माणकेश्वर महाशिवरात्री अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत पारायण सोहळा श्री क्षेत्र माणकेश्वर मंदिर वाघापूर येथे आयोजित करण्यात आला होता.श्री माणकेश्वर महाशिवरात्र अखंड हरिनाम सप्ताहाचे हे सतरावे वे वर्ष आहे. यावेळी जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले की, नैसर्गिक अरण्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाघापूर येथील श्री माणकेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. येथे नवनाथांपैकी अडबंगनाथ यांचे पदस्पर्शाने ही भूमी पुण्यवान झालेली आहे. येथे केलेली साधना सफल होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी गाव भूषण माननीय माजी पोलीस अधिकारी कृष्णाजी इंदलकर, आधारस्तंभ अर्जुन भाऊ फौजी,ह .भ. प .बापूसो गायकवाड महाराज, बापू किसन कुंजीर पाणलोट, देवेंद्र पांडुरंग कुंजीर, बापू किसन कुंजीर पाणीवाले, विजय तुकाराम कुंजीर, वसंत गुरुजी , रोहिदास कुंजीर, रामदास आप्पा, कैलास तात्या, बाजीराव नाना कुंजीर,अरुण तात्या,रामचंद्र कुंजीर, अशोक कुंजीर, गौतम दादा कुंजीर, मच्छिंद्र कुंजीर,दादा कुंजीर, बापू कुंजीर, योगेश कड, रवानाना कुंजीर, माऊली इंदुलकर, संतोष कुंजीर, नारायण देव, बापूसो गायकवाड महाराज,वाघापूरच्या प्रतिष्ठित सरपंच सौ दिपाली कुंजीर, सौ सविता कुंजीर, सौ दीक्षित बाई, सौ विजयंता इंदलकर, सौ सुमनताई वाईकर, प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ पअनंता महाराज परदेशी शिरवली बारामती, ह भ प सतीश महाराज खोमणे रामायणाचार्य थोपटेवाडी, ह भ प झाडे महाराज तर ढोकी, ह भ प शिवाजी महाराज पवार श्रीगोंदा, ह भ प श्रीपाद महाराज जाधव सातारा यांची सुश्राव्य कीर्तने झाली. त्याचप्रमाणे वारकरी भूषण जेऊर ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे काल्याचे किर्तन झाले. याच कार्यक्रमांमध्ये महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर ह भ प डॉ.रवींद्र भोळे हिंदू रत्न पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ,अपंग सेवक यांचे महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रवचन झाले. त्याचप्रमाणे दिव्यानंदगिरी मौनगिरी महाराज मानकेश्वर मंदिर पुजारी यांचे शिवपुराण आधारित प्रवचन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री माणकेश्वर महाशिवरात्री अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत पारायण सोहळा, माणकेश्वर मंदिर, समस्त ग्रामस्थ मंडळी वाघापूर श्री शेत्र मानकेश्वर मंदिर येथे संपन्न झाला.

