शशिकांत हिंगोणेकर यांचा “उत्तरार्ध” अंतर्बाह्य आंतरिक चिंतनशील ! प्रा. डाॅ.कीर्तीकुमार मोरे
![]()
शशिकांत हिंगोणेकर यांचा
“उत्तरार्ध” अंतर्बाह्य आंतरिक चिंतनशील !
प्रा. डाॅ.कीर्तीकुमार मोरे
जळगाव-आज रोजी प्राईम पब्लिशिंग हाऊस जळगाव वतीने प्रकाशित शशिकांत हिंगोणेकर यांचा ५१वा कवितासंग्रह “उत्तरार्ध ” संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड जि .परभणी येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. डाॅ. कीर्तीकुमार मोरे यांचे शुभहस्ते आणि अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. ज्ञानेश्वर कांबळे आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक , प्रदीप पाटील प्रकाशक प्राईम पब्लिशिंग हाऊस जळगाव
आणि राजू रणवीरसंशोधन सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी यांचे उपस्थित संपन्न झाला. शशिकांत हिंगोणेकर यांची कविता ही “युद्ध सुरू आहे” ते “उत्तरार्ध ” असा युद्धरत संघर्षशील आणि अंतर्बाह्य आंतरिक आणि चिंतनशील असल्याचे प्रतिपादन या निमित्ताने डाॅ. कीर्तीकुमार मोरे यांनी या निमित्ताने केले. उपस्थित सर्वांचे आभार प्राईम पब्लिशिंग हाऊस, जळगावचे व्यवस्थापक कृष्णा पाटील यांनी केले.

