स्वतःची पुनर्निर्मिती करा ; कितीही संकटे वा अडचणी येवोत स्वतःला सिद्ध करा -नीळकंठ आप्पा गायकवाड यांचे आवाहन, [ ‘ ज्ञानाचा गौरव , सेवाभावाचा सन्मान ‘ सकल ज्ञान महोत्सव २०२६ बक्षिस वितरण सोहळा जल्लोषात संपन्न ]
1 min read

स्वतःची पुनर्निर्मिती करा ; कितीही संकटे वा अडचणी येवोत स्वतःला सिद्ध करा -नीळकंठ आप्पा गायकवाड यांचे आवाहन, [ ‘ ज्ञानाचा गौरव , सेवाभावाचा सन्मान ‘ सकल ज्ञान महोत्सव २०२६ बक्षिस वितरण सोहळा जल्लोषात संपन्न ]

Loading

स्वतःची पुनर्निर्मिती करा ; कितीही संकटे वा अडचणी येवोत स्वतःला सिद्ध करा : नीळकंठ आप्पा गायकवाड यांचे आवाहन,

‘ ज्ञानाचा गौरव , सेवाभावाचा सन्मान ‘ सकल ज्ञान महोत्सव २०२६ बक्षिस
वितरण सोहळा जल्लोषात संपन्न

जळगाव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्ले सर)

” स्वतःची पुनर्निर्मिती करा ; कितीही संकटे वा अडचणी येवोत स्वतःला सिद्ध करा.” असे आवाहन डायटचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना केले. मार्गदर्शनात गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी व सवंगड्यांची रायरेश्वराच्या मंदिरातील स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा , जिवा महाला , सैय्यद बंडा यांची स्वराज्यनिष्ठा , अतुलनीय युद्धकौशल्य, पराक्रम, त्याग, सेवा व समर्पणाचे ऐतिहासिक प्रेरक प्रसंग सांगून रोमांचीत केले ! जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त आयोजनांतर्गत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा २०२६ अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे पुर्वाध्यक्ष राजुमामा भोळे ( आमदार, जळगाव शहर ) होते. विचारपीठावर प्रमुख वक्ते अर्थात महागुरू नीळकंठ गायकवाड, सौ. दिपमाला काळे ( महापौर , जळगाव शहर ) व जयश्री महाजन ( माजी महापौर , जळगाव शहर तथा विद्यमान नगरसेविका ), गायत्री भंगाळे ( लोकनियुक्त नगराध्यक्ष, भुसावळ ), विजय पवार ( शिक्षण विस्तार अधिकारी ), प्रो. रफिक शेख ( एच.ओ.डी., डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन, जी.एच. रायसोनी कॉलेज ), भारती काळे ( संचालिका हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट ), सुनील पाटील ( आर.सी. पटेल संस्था, शिरपूर ) , ॲड .निखिल पाटील, संघपाल तायडे ( सिने गायक ),अर्चना माळी ( संचालिका, आर्चिज ब्यूटी ॲकॅडमी ) , निता सोनवणे ( अध्यक्ष, मुक्ताई महिला बहुउदेशीय संस्था व माजी नगरसेविका ) उपस्थित होते.
—————————————————————————————————-
*कार्यक्रमाची क्षणचित्रे*
🔰 प्रारंभी दिवंगत वेदांत नाले , श्रीमती प्रतिक्षा मनोज पाटील ( स्वामी समर्थ गृप संचालिका ), माजी उपमुख्य मंत्री अजीत दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🔰 सकल ज्ञान महोत्सव परीक्षा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त सुजाता मोरे ( इयत्ता – ८ वी ) हिस अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते सायकल सुपूर्द
🔰 भार्गवी बेलसरे ( इयत्ता – ६ वी ) हिस ११०० रुपयांचे रोख बक्षिस प्रदान
🔰 संघपाल तायडे यांच्या भावमधुर गीत गायनाने कार्यक्रमात रंगत
🔰 सुपूत्र वेदांत काळाने हिरावून घेतल्यानंतरही वैयक्तिक दुःखाचे रडगाणे न गाता पंकज नाले व्रतस्थपणे शैक्षणिक व सामाजिक कार्य अविरत करीत असल्या बद्दल समस्त प्रमुख अतिथींनी केले मनस्वी कौतूक
🔰 नवनियुक्त भुसावळ महापौर मा. गायत्री भंगाळे यांचा जळगाव लेवा समाजातर्फे सत्कार – सत्कार कर्ते प्रल्हाद भारंबे , पंकज नाले , दिलीप भारंबे , प्रकाश वराडे , हेमंत भंगाळे
🔰 पंकज नाले यांचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे पत्रकार शैलेंद्र ठाकुर , दीपक दाभाडे, किसन मेहेते यांच्या हस्ते श्रीफळ व रुमाल देऊन भावपूर्ण सत्कार
🔰 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल प्रो. रफिक शेख यांचा जनमत प्रतिष्ठान तर्फे अप्पासाहेबांच्या हस्ते हृद्य सत्कार
🔰 मान्यवरांचा सत्कार बुके ऐवजी वैचारीक व पुरोगामी पुस्तकांनी होण्यासाठी
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे ग्रंथ भेट
🔰 उत्कृष्ट संचालन केल्या बद्दल निवेदिका ज्योती राणे तसेच सामाजिक कार्यकर्त्या तथा जनमत प्रतिष्ठान सचिव हर्षाली ढाके यांचा माजी महापौर जयश्री महाजन यांचे तर्फे सत्कार
———————————————————————————————–
आमदार राजु मामा भोळे मार्गदर्शनात म्हणाले की, ” गुणवंत पुरस्कारार्थी यांनी समाजाने दिलेल्या शाबासकीचे उत्तरदायित्व स्विकारणे गरजेचे आहे दैनिक जीवनात ८० % व वैयक्तिक जीवनासाठी १० % वेळ जातो ; मात्र १० % वेळ राष्ट्रसेवेसाठी , समाज व गावाच्या उन्नतीसाठी देणे अपेक्षित आहे.”
***************************************************************** **ज्ञानवंत राज्यपुरस्काराने सन्मानित झालेले पुरस्कारार्थी*
*विशेष ज्ञानवंत शिक्षिका पुरस्कार* – श्रीमती माया आमोदकर
*ज्ञानवंत मुख्याध्यापक* – प्रा. व्ही.एम.चौधरी, दिलीप कुमार जाधव, छाया नाईक, सुरेश अहिरे , वंदना शिर्के, विजय चौधरी
*ज्ञानवंत शिक्षक / शिक्षिका -* दिगंबर बाविस्कर , वर्षा अहिरराव , नीता वानखेडकर , भारती ठाकरे , अलका पितृभक्त , प्रज्ञा नारखेडे
*समाज प्रबोधन क्षेत्र -* प्रा. दिलीप भारंबे
*शैक्षणिक क्षेत्र -* सुवर्णा अडकमोल , स्मिता जयकर , सुनील पाटील , प्रताप कुमावत, योगेंद्र पवार ,चेतन बिरारी , चंद्रकांत पाटील
*सामाजिक क्षेत्र -* शैलेंद्र ठाकूर , ॲड. निखिल पाटील, ॲड. सागर सरोदे , मनिषा पाटील, पुजा पंडित *समाजसेवक*- मिनाक्षी भोसले , रोहित महाले
*आरोग्य सेवक -* ज्ञानेश्वर पाटील *आरोग्यदूत -* सौ.भारती काळे , डॉ . उल्हास बेंडाळे *ब्युटीशियन -* मयुरी बडगे , जागृती भंगाळे
*पत्रकारीता -* ईश्वर महाजन, चंदन पाटील, अजय भामरे , रवि मोरे
*शेती -* प्रताप सोनवणे , रमेश झारखंडे *पर्यावरण -* वसंत पाटील
*क्रिडा -* सागर सोनवणे *संस्था -* शिवतेज प्रतिष्ठान, जळगाव
*****************************************************************
मा.महापौर दीपमाला काळे मार्गदर्शनात म्हणाल्या की, ” पुरस्कारार्थी समाजाचे आधारस्तंभ आहेत.”, माजी मा.महापौर जयश्री महाजन, अर्चना माळी , गायत्री भंगाळे ( महापौर, भुसावळ ), सुनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
समारोपीय अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रो. रफिक शेख म्हणाले की, ” साधारण व्यक्तिमत्वाला असाधारण बनविणे म्हणजेच जनमत प्रतिष्ठान ! ” समयोचित आशयसंपन्न शेरोशायरीने अध्यक्षांनी चैतन्य आणले.
कार्यक्रमाची प्रस्तावना किशोर पाटील , सुत्रसंचालन किशोर पाटील, आभार प्रदर्शन हेमंत बडगुजर यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम लोखंडे , जनमत प्रतिष्ठान सचिव हर्षाली पाटील, शशिकांत भावसार , विजय लुल्हे ( भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तफ भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख ), आदर्श शिक्षिका ज्योती राणे, हेमंत बडगुजर, कलाशिलक सुनिल दाभाडे यांनी अमूल्य सहकार्य केले. कार्यक्रमास
देविदास सुर्यवंशी, वृक्षमित्र सुरेंद्र चौधरी, वल्लभ सुर्यवंशी , कृतिका सुर्यवंशी यांसह विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *