महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड !
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !…
▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड !
धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : येथील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम तसेच पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षकांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
पालक-शिक्षक समितीचे प्रमुख पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविकातून सभेचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.एस. पवार होते. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघ व माता-पालक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक जे. एस. पवार, उपाध्यक्षपदी सुनील सुक्राम भिल, तर सचिवपदी पी. डी. पाटील यांची निवड झाली. प्रत्येक वर्गातून दोन पालक प्रतिनिधींची निवड करून १२ सदस्यीय कार्यकारिणी गठित करण्यात आली. तसेच माता-पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सुरेखा करोसिया आणि सचिवपदी व्ही पी वऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. पालक-शिक्षक समितीचे प्रमुख एच डी माळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा आढावा घेत पालक-शिक्षक संघाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची शिस्त, शिष्यवृत्ती योजना, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमास समाधान भिल, वेचान बारेला, महाग्या बारेला, अनिल भोई, विकी चंडाले, मनोज सोनवणे, नितीन चंडाले, रवी करोसिया, सुरेखा करोसिया, भारती चंडाले, अकिलशहा फकीर, उषा कुंभार, सुलोचना करोसिया, मनीषा बारेला, बापू भिल यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील यांनी केले, तर एच.डी.माळी यांनी आभार मानले.

