फरांदे पार्क येथे महाशिवरात्री निमित्त शिव ध्वजारोहण व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न , ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाचा आध्यात्मिक-सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
1 min read

फरांदे पार्क येथे महाशिवरात्री निमित्त शिव ध्वजारोहण व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न , ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाचा आध्यात्मिक-सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

फरांदे पार्क येथे महाशिवरात्री निमित्त शिव ध्वजारोहण व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न,

ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाचा आध्यात्मिक-सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी प्रतिनिधी
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त फरांदे पार्क येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयात शिव ध्वजारोहण, ज्योतिर्लिंग दर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, अध्यात्म आणि सेवा या त्रिसूत्रीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमास ब्रह्माकुमारीज राजयोगिनी अनिता दिदी (संचालिका), अष्टविनायक हॉस्पिटलचे डॉ. साईबाबा अंकुशकर (एम.डी. मेडिसीन), बी.के. सत्यादिदी व डॉ. बी.के. रामरावजी जाधव भाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिव ध्वजारोहण विधी पार पडताच उपस्थितांना आध्यात्मिक शपथ देण्यात आली. “शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे शक्ती” या संदेशातून जीवनात सदाचार, संयम आणि सकारात्मकता जोपासण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर ज्योतिर्लिंग दर्शनाने वातावरण अधिक भक्तिमय झाले.
कार्यक्रमाचा सामाजिक पैलू म्हणून आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. अंकुशकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत नागरिकांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या. उपस्थितांना आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने बी.के. अनिता दिदी व बी.के. सत्यादिदी यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन करत आत्मशुद्धी, सकारात्मक विचार आणि राजयोग साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी.के. जाधव भाई यांनी केले. फरांदे पार्क परिसरातील नागरिक तसेच बी.के. भाई-बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा उपक्रम परिसरासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *